शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कॉल करू द्या, म्हणून घेतलेला मोबाईल महिलेने कपड्यात लपवला; परत देण्यासाठी मागितले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:19 IST

आता एकटीदुकटी महिलाही करू लागली लूटमार; छत्रपती संभाजीनगरातील अदालत रोडवरील धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगर : संकटात असल्याचे सांगत कॉल करण्यासाठी मोबाइल मागून चक्क भर रस्त्यावर महिलेनेच एका तरुणाला लुटले. सोमवारी रात्री ७:३० वाजता अदालत रोडवरील एलआयसी कार्यालयासमोर ही घटना घडली. वेदांतनगर पोलिसांनी याप्रकरणी भारती वाकोडे नावाच्या महिलेला ताब्यात घेतले.

बँकेत काम करणारे २९ वर्षीय किरण गवळे २ जून रोजी क्रांतीनगर येथे ग्राहकाकडे गेले होते. तेथे साडेतीन हजार रुपयांची वसुली करून ते अदालत रोडवरून एलआयसी कार्यालयासमोर दुसऱ्या ग्राहकाची वाट पाहत होते. त्यावेळी तेथे एका महिलेने त्यांच्याजवळ जात संकटात असल्याचे सांगून मदतीसाठी कॉल करण्याचे कारण सांगत मोबाइल मागितला. त्यांनी फोन दिला. पण तिने कोणालाही कॉल न करता मोबाइल स्वत:च्या कपड्यामध्ये ठेवून दिला. गवळे यांनी तिला मोबाइल परत मागितला. मात्र, त्यावर तिने तुझ्याकडील सर्व पैसे दे, असे धमकावले.

गळा पकडून पैसे हिसकावलेमहिलेने पुन्हा मोबाइल बाहेर काढताच गवळे यांनी तो तिच्या हातातून हिसकावून घेतला. ते पुढे चालत असताना महिलेने त्यांचा पाठलाग करून गचांडी पकडली. आरडाओरडा करत त्यांच्या खिशात हात घालून २ हजार रुपये काढून घेत शिवीगाळ व मारहाण केली. तिच्या विचित्र वागण्यामुळे गवळे घाबरून गेल्याने ते जवळच्या पानटपरीवर गेले. टपरीचालकाने तिला गवळे यांना पैसे परत देण्यास सांगितले. मात्र, तिने टपरीचालकालादेखील मारण्याची धमकी देत आरडाओरड सुरू केली.

यापूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाईगवळे यांनी तत्काळ वेदांतनगर पाेलिस ठाण्यात धाव घेत निरीक्षक प्रवीणा यादव यांच्याकडे तक्रार केली. यादव यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक वैभव मोरे यांनी तिचा शोध सुरू केला. भारतीवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तिच्याविरुद्ध लुटमारीच्या तक्रारीसाठी कोणी समोर येत नव्हते. गवळे यांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करून तिला अटक केल्याचे यादव यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर