शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कपडे वाळत घातलाना शॉक, महिलेचा मृत्यू; गंगापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 20:04 IST

महिलेच्या तीन लहान मुलांनी आक्रोश केल्याने उपस्थितांनादेखील गहिवरून आले

गंगापूर : कपडे वाळवण्यासाठी घालताना विजेचा जोरदार शॉक बसल्यामुळे तालुक्यातील काटेपिंपळगाव येथील विवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (२०) रोजी सकाळी घडली; संगीता अनिल देशमुख (२९) असे मृत महिलेचे नाव आहे.  धुतलेले कपडे सुकविण्यासाठीसंगीता मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे आपल्या घराच्या छतावर गेल्या होत्या.

कपडे सुकविण्यासाठी पांगवत असताना एक कपडा वाऱ्यामुळे बाजूच्या घरासाठी गेलेल्या मीटर वायरच्या तारेत अडकला. संगीता तो अडकलेला कपडा काढण्यासाठी गेल्या, मात्र त्यावेळी पावसामुळे तारेत विद्युत प्रवाह उतरला होता. या तारेचा संगीता यांना स्पर्श झाल्याने त्यांना जोराचा शॉक बसला व त्या बाजूच्या पत्राच्या घरावर कोसळल्या. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केल्याने स्थानिकांनी व नागरिकांच्या मदतीने त्यांना सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी उशिरा त्यांच्यावर शोककुल वातावरणात काटेपिंपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या तीन लहान लहान मुलांनी आक्रोश केल्याने उपस्थितांना देखील गहिवरून आले होते. मृत संगीता यांच्या पश्चात पती, दोन मुल, एक मुलगी असा परिवार आहे. संगीता यांच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, गत तीन महिन्यात शॉक लागून मृत्यू होण्याची काटेंपिंपळगावातील ही दुसरी घटना आहे. घटनेची नोंद सिल्लेगाव पोलिसात ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूWomenमहिला