शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार हरवला; निवृत्त प्रशासकीय अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 15:50 IST

Retired Administrative Officer Bhujangrao Kulkarni passes away १९३९ मध्ये ते निजाम राजवटीत मेदक तालुक्यात ‘तहसीलदार’ या पदावर मुलकी प्रशासकीय सेवेत रुजू झाले

औरंगाबाद : मराठवाडा आणि  महाराष्ट्राच्या विकासाबद्दल जागरुकपणे कर्तव्य बजावलेले आणि राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे १०४ व्या वर्षी निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व हैदराबाद संस्थानात १९३९ मध्ये  प्रशासकीय नोकरीतून आपल्या कारकीर्दीला सुरुवात करणारे भुजंगराव कुलकर्णी हे १९७४ च्या अखेरीस राज्याच्या सिंचन विभागाचे भारतीय प्रशासकीय सेवेतील शेवटचे सचिव म्हणून निवृत्त झाले होते. 

निवृत्तीनंतरही मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, भुजंगराव हे पीएच.डी. झालेले नसतानाही त्यावेळचे राज्यपाल अलियावर जंग यांनी विद्यापीठाला चांगला प्रशासक हवा म्हणून त्यांना मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नेमले. भुजंगरावांनी ही जबाबदारी उत्तमपणे पार पाडली. राज्य नियोजन मंडळावर व दांडेकर समितीवर सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य व अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दांडेकर समिती, न्हावाशेवा बंदर, अकृषी-विद्यापीठांची लेखासमिती, मराठवाडा ग्रामीण बॅंक, मराठवाडा वैधानिक मंडळ, कापूस एकाधिकार योजना पुनर्विलोकन समिती, राज्य नियोजन मंडळ, टेक्‍स्टाईल मिल, राज्य सिंचन आयोग, अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. सरस्वती भुवन, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, सेंट्रॉन कंपनी, आयसीम कॉलेजसारख्या अनेक संस्थांद्वारे ते सतत कार्यरत राहिले. 

१९५२ ते २०१९ नॉनस्टॉप मतदानदेशात संविधान अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच १९५२ साली लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते २०१९ ला झालेल्या १७ व्या लोकसभा निवडणुकीत सेवानिवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

पहिल्या जणगणनेचे प्रमुख म्हणून काम १ मे १९६० ला महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांची निर्मिती झाली. या दरम्यान, मुंबईत भारताच्या पहिल्या जणगणनेचे अवघड आणि जोखमीचे काम भुजंगराव यांनी मोठ्या कुशलतेने पार पाडले. तत्कालीन २६ जिल्ह्यातील जवळ जवळ १ लाख गणनाकारांना प्रशिक्षण देणे, व त्यांच्याकडून काम करून घेणे असे प्रचंड काम त्यांना करावे लागले.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर आणि सारस बागेची उभारणीभुजंगराव कुलकर्णी यांची १९६५ ला पुणे महानगर पालिकेत आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. या काळात पुण्याचे नेहरू स्टेडियम, बालगंधर्व रंगमंदिर, मंडईची इमारत, स्वच्छ पाणी, पुरवठा, चौकांची व रस्त्यांची सुधारणा, सारस बाग ही कामे त्यांच्या हातून पार पडली. पुण्याच्या प्रगतीतील हे मैलाचे दगड आजही ठसा उमटवून आहेत. 

भुजंगराव कुलकर्णी यांची कारकीर्दभुजंगराव आप्पाराव कुलकर्णी यांचा जन्म परळी तालुक्यातील पिंपळगाव या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. १९३२ ला औरंगाबाद येथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३४ ला वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. १९३६ साली हैदराबाद येथून ते  प्रथम क्रमांकाने बी.एस्सी. उत्तीर्ण होऊन  त्यांनी उस्मानिया विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले. १९३८ साली ते ह्याच विद्यापीठातून भौतिकशास्त्रामध्ये एम.एस्सी  प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९३९ मध्ये ते निजाम राजवटीत मेदक तालुक्यात ‘तहसीलदार’ या पदावर मुलकी प्रशासकीय सेवेत रुजू झाले. १९४० ला ते ‘डिस्ट्रीक्ट लँड रेकॉर्ड ऑफीसर’ म्हणून औरंगाबाद येथे रुजू झाले. १९४७ ला ते ‘असिस्टंट कमिशनर’ या श्रेणी-१ च्या मुलकी सेवेत आले. ते १९५० साली आयएएस झाले. १९५३ ला ते नांदेडला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. 

१९५४ ला भूमी आयोग स्थापन झाला. त्या विभागाचे सचिव म्हणून भुजंगरावांची नेमणूक झाली. या आयोगाचा अहवाल सचिव म्हणून भुजंगरावांनी तयार केला. १९५६ ला राज्य पुनर्रचनेमुळे मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांबरोबर भुजंगराव मुंबई राज्यात आले आणि औरंगाबादला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. १९५९ला ते जनगणनेच्या कामासाठी भारतातील सर्वात मोठ्या राज्याच्या जनगणनेसाठी ‘प्रमुख’ म्हणून त्यांनी काम पाहिले. 

१९६५ ला पुणे महानगर पालिकेकडे ते म.न.पा. आयुक्त म्हणून आले. १९६९ ला ते सचिव म्हणून मुंबईत आले. सुरूवातीला नगरविकास, आरोग्य व गृहनिर्माण या तीन खात्याचे सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. १९६९च्या अखेरीस त्यांनी राज्याच्या सिंचन विभागाचा सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारली व १९७४ च्या अखेरीस भारतीय प्रशासकीय सेवेतील शेवटचे सचिव म्हणून ते निवृत्त झाले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्र