शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

काही देणे - घेणे नसताना उचापती; उदंड झाले माहिती ‘अधिकार’ वाले!

By मुजीब देवणीकर | Updated: July 25, 2023 12:25 IST

विशिष्ट हेतूसाठी अर्ज करणाऱ्यांचा बंदोबस्त कसा करावा? शासकीय कार्यालयांमधील अधिकारी त्रस्त

छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकार कायद्याखाली दररोज शेकडोंच्या संख्येने अर्ज प्राप्त होतात. प्रत्येक कार्यालयात ठरावीक आठ ते दहा कार्यकर्तेच माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करतात. त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अक्षरश: मेटाकुटीला आणले आहे. विशिष्ट हेतूसाठी अर्ज करणाऱ्यांचा बंदोबस्त कसा करावा, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. अत्यंत उपयुक्त शासकीय माहिती सर्वसामान्यांना एका साध्या अर्जावर उपलब्ध होऊ लागली. मागील काही वर्षांपासून या माहिती अधिकाराचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात सुरू झाला. महापालिकेत नगररचना, अतिक्रमण हटाव विभाग, अस्थापणा, लेखा, कामगार, आदी विभागात, तर दररोज किमान आठ ते दहा अर्ज हमखास येतात. विशेष बाब म्हणजे ठरावीक मंडळींच वेगवेगळी माहिती विचारत असतात. माहिती दिल्यानंतरही उपप्रश्न टाकून वेगळी माहितीचे अर्ज टाकतात. या प्रकाराला अधिकारी व कर्मचारी प्रचंड कंटाळले आहेत. वारंवार माहिती कोणत्या उद्देशाने विचारण्यात आली हेसुद्धा आता अधिकाऱ्यांच्या लक्षात येत आहे. काही अर्जदारांची तर नावेसुद्धा पाठ झाली.

हा प्रकार इतर शासकीय कार्यालयांमध्ये आहे का? याचा कानोसा काही अधिकाऱ्यांनी घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. महापालिकेत त्रास देणारेच जिल्हा परिषद, नॅशनल हायवे, जिल्हाधिकारी कार्यालयात, तहसील, पुरवठा, भूमी अभिलेख, तसेच सार्वजनिक बांधकाम, घाटी, समाजकल्याण, आदी ठिकाणी विशिष्ट मंडळीच अर्ज करीत असल्याचे समोर आले. या गंभीर प्रश्नावर अधिकाऱ्यांनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रत्येक शासकीय कार्यालयातील विविध विभागात वारंवार अर्ज देणारे कोण? याची यादीच तयार करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. ही यादी पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

मनपात झाला होता एकदा प्रयोगसात वर्षांपूर्वी महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून माहिती अधिकार कायद्याअंतर्गत वारंवार त्रास देणाऱ्यांची यादी तयार करून थेट पोलिस आयुक्तांना दिली होती. त्यामुळे अनेक दिवस माहिती अधिकारचा अर्ज घेऊन येणारे गायब झाले होते.

माहिती द्यावीच लागतेमहापालिकेच्या विविध विभागांत अनेक जण माहिती अधिकारात अर्ज करतात. कायद्यानुसार आम्हाला माहिती द्यावीच लागते. अनेक जण वारंवार अर्ज करतात, त्यानंतरही माहिती द्यावी लागते. अन्यथा अपिलात कर्मचाऱ्यांना दंड लागतो. माहिती काढण्यासाठी अनेकदा विलंब होतो.-ए.बी. देशमुख, शहर अभियंता, मनपा.

यंत्रणेवर ताण वाढतोयसार्वजनिक कामाची माहिती कोणी मागत असेल तर ठीक आहे, ज्यांचा जिल्ह्यातील सार्वजनिक कामाशी कुठलाही संबंध नाही, त्यांचेही अर्ज येत आहेत. त्यामागे त्यांचा हेतू काय, हे सुद्धा स्पष्ट नसते. या सगळ्या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण वाढतोय. हे त्रासदायक ठरत आहे.- डॉ. अनंत गव्हाणे, अप्पर जिल्हाधिकारी.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी