शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याचा विकास सिंचनाशिवाय अशक्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:46 IST

देशातील, राज्यातील कोणताही एखादा भाग इतरांच्या तुलनेत मागास राहिलेला असेल, तर तो असमतोल कमी करण्यासाठी कृषी क्षेत्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. औद्योगिक असमतोलाच्या अगोदर कृषी क्षेत्रातील असमतोल कमी केल्यास विकासाला चालना मिळते. यासाठी कृषी आणि जलसिंचनाच्या सुविधा वाढविणे गरजेचे असते. यामुळे मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जलसिंचनाशिवाय पर्याय नसल्याचे मत इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च आॅन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स रिलेशन इन्स्टिट्यूटमधील प्रोफेसर गायत्री मोहन यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देगायत्री मोहन : सामाजिकशास्त्रे विभागात आंतरराष्ट्रीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशातील, राज्यातील कोणताही एखादा भाग इतरांच्या तुलनेत मागास राहिलेला असेल, तर तो असमतोल कमी करण्यासाठी कृषी क्षेत्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. औद्योगिक असमतोलाच्या अगोदर कृषी क्षेत्रातील असमतोल कमी केल्यास विकासाला चालना मिळते. यासाठी कृषी आणि जलसिंचनाच्या सुविधा वाढविणे गरजेचे असते. यामुळे मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जलसिंचनाशिवाय पर्याय नसल्याचे मत इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च आॅन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स रिलेशन इन्स्टिट्यूटमधील प्रोफेसर गायत्री मोहन यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाच्या एकत्रित सॅप-२ कार्यक्रमांतर्गत ‘मराठवाड्याचा विकास : संधी आणि आव्हाने’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन जपानमधील कागावा विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. रवींद्र रानडे, प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. संजय साळुंके, विभागप्रमुख डॉ. धनश्री महाजन, डॉ. अशोक पवार, डॉ. सुनील नरवडे आदींच्या उपस्थितीत झाले. उद्घाटनानंतरच्या दुसऱ्या सत्रात प्रो. गायत्री मोहन यांनी संशोधन पेपरचे सादरीकरण केले. यात त्यांनी कृषी असमतोलावर भाष्य केले. याच चर्चासत्रात दिल्ली येथील सामाजिक विकास केंद्राच्या डॉ. अनन्या वाजपेयी यांनी सीमांतिक घटकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले. तत्पूर्वी उद्घाटन समारंभात डॉ. रवींद्र रानडे यांनी बीजभाषण केले. यात त्यांनी जपानमधील इतर प्रदेशांच्या तुलनेत मागास असलेल्या भागात शिक्षण आणि अभियांत्रिकी उद्योग यांच्यात समन्वय निर्माण करून प्रगती साध्य केल्याचे सांगितले. हेच मॉडेल अमेरिकासह जगातील इतर प्रगत राष्ट्रांनी स्वीकारल्याचेही डॉ. रानडे यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. वाल्मीक सरवदे यांनीही मनोगत व्यक्त केले. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. धनश्री महाजन यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी तीन विभागांच्या सहकार्यातून सुरू असलेल्या प्रकल्पासह संशोधनावर प्रकाश टाकला. डॉ. शूजा शाकीर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सोनल उबाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तिन्ही विभागातील विद्यार्थी, परदेशी संशोधक उपस्थित होते.