शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

ऐन हिवाळ्यात शहराची तहान १८ एमएलडीने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 17:34 IST

उन्हाळा सुरू होण्यास अजून बराच अवकाश असला तरी शहरात पाण्याची आतापासूनच मागणी वाढली आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांकडून दबावतंत्राचा अवलंब;मनपा कर्मचाऱ्यांना धमक्या पाणीपुरवठा विभागात नोकरी नको म्हणण्याची कर्मचारी, अधिकाऱ्यांवर वेळ 

औरंगाबाद : उन्हाळा सुरू होण्यास अजून बराच अवकाश असला तरी शहरात पाण्याची आतापासूनच मागणी वाढली आहे. एकीकडे विविध शासकीय कार्यालयांनी मनपाकडे पाण्यासाठी केलेली मागणी थक्क करणारी आहे. दुसरीकडे वॉर्डात नवीन जलवाहिन्यांना जोडणी द्या म्हणून लोकप्रतिनिधींचे दबावतंत्र सुरू झाले असून, महापालिका पाणीपुरवठा विभाग संकटात सापडला आहे. या विभागात नोकरीच नको, अशी अधिकारी व कर्मचारी मागणी करीत आहेत.

घाटीला हवे १५ लाख लिटर पाणीघाटी रुग्णालयात अद्ययावत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. तब्बल १५० कोटी रुपये खर्च करून हे रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. स्वतंत्र विद्युत ट्रान्स्फॉर्मर आणि पाण्यासाठी उद्घाटन रखडले आहे. घाटी रुग्णालयाने महापालिकेकडे तब्बल १५ लाख लिटर दररोज पाण्याची मागणी केली आहे. दीड एमएलडी पाणी दररोज घाटीला कोठून द्यावे हा सर्वात मोठा प्रश्न महापालिकेला भेडसावतो. पाणी न दिल्यास १०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर पाणी फेरण्याची वेळ येईल. डेंटल आणि कॅन्सर हॉस्पिटलला दररोज पाणी  देण्यात येत आहे. त्यांनाही अतिरिक्त पाणी हवे आहे.

पोलीस आयुक्तालयाला ५ लाख लिटरपोलीस आयुक्तालयाची नवीन अद्ययावत इमारत अलीकडेच बांधण्यात आली आहे. या इमारतीसह कर्मचारी निवासस्थानांसाठी दररोज ५ लाख लिटर पाण्याची मागणी मनपाकडे आली आहे. सध्या मनपाकडून देण्यात येणारे पाणी कमी पडत आहे. ०.५ एमएलडी अतिरिक्त पाणी द्यावे, अशी मागणी मनपाकडे करण्यात आली आहे. हे पाणी द्यायचे म्हटले तर ज्युबिली पार्क पाण्याच्या टाकीवर ताण वाढणार आहे.

चिकलठाणा रुग्णालयाला हवे पाणीचिकलठाण्यात २०० खाटांचे अद्ययावत सिव्हिल हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाला दररोज १ एमएलडी पाणी हवे. महापालिकेने फक्त २ इंचाचे नळ दिले आहेत. या पाण्यावर रुग्णालयाचे कामकाज अत्यंत अवघड आहे. हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागल्याने पाण्याची मागणीही झपाट्याने वाढत आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळाची वाढली तहानचिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज किमान ५ विमाने ये-जा करतात. शेकडो प्रवासी त्यात असतात. विमानतळाला मागील काही वर्षांपासून पाणी कमी पडत आहे. मनपाने विमानतळाला फक्त ४ इंचाचे एक नळ कनेक्शन दिले आहे. दररोज २५ हजार लिटर पाण्याची किमान गरज पडते. मनपाने किमान ८ इंचाचे कनेक्शन तरी द्यावे, असे विमानतळ प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

वॉर्डांमधील ५० लाईनसमांतर जलवाहिनीच्या कंपनीने शहरातील ३० पेक्षा अधिक वॉर्डांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकून ठेवल्या आहेत. या जलवाहिन्यांना जोडणी द्या म्हणून नगरसेवक मनपा अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकत आहेत. मनपा निवडणुका आता १४ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे नगरसेवकांकडून धमकीसत्रही सुरू झाले आहे.

१८ एमएलडीची मागणी वाढली जायकवाडीहून दररोज १३० ते १३५ एमएलडी पाणी शहरात येते.या पाण्यावर शहरातील ११५ वॉर्डांमधील नागरिकांची तहान भागत आहे. मनपाकडे आता १८ एमएलडी पाण्याची मागणी वाढली आहे. मनपाने पाणी न दिल्यास मोठे शासकीय प्रकल्प रखडण्याच्या मार्गावर आहेत. मनपाकडे सध्या उपलब्ध असलेल्या पाण्यातून १८ एमएलडी पाणी दिल्यास शहराचा पाणीपुरवठा आठ दिवसांतून एकदा होईल.जायकवाडीहून स्वतंत्र जलवाहिनी टाकून पाणी आणण्याचे सध्या तरी मनपाकडे कोणतेच नियोजन नाही.दोन ते तीन वर्षे शहरात वाढीव पाणी येण्याची शक्यताही नाही. उपलब्ध पाण्यातून मनपाला वाट काढावी लागणार आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ