शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फार्मसी विद्यार्थिनींचे अडीच वर्षांपासून कुलूपबंद वसतिगृह उघडणार का ?

By योगेश पायघन | Updated: January 19, 2023 15:23 IST

नवी दोन मजली इमारत अडगळीत : फर्निचर, सुरक्षा भिंत, देखभाल दुरुस्तीची गरज

- योगेश पायघनऔरंगाबाद : शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या ३६ मुलींसाठी वसतिगृहाला मंजुरी मिळाल्यानंतर ते एका तपानंतर शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात पूर्णत्वास आले. मात्र, गेल्या अडीच वर्षांत फर्निचरसह सुरक्षा भिंत, पाण्याची व्यवस्था न झाल्याने हे वसतिगृह कुलूपबंद आहे. सरकारी काम बारा वर्षे थांब, अशा परिस्थितीत अडगळीत पडलेले हे वसतिगृह यावर्षी तरी विद्यार्थिनींना मिळावे, अशी मागणी विद्यार्थिनींमधून होत आहे.

सन २००९ मध्ये १ कोटी ४२ लाखांचे वसतिगृह बांधण्याची परवानगी मिळाली. पूर्णत्वास येण्यास १२ वर्षे लागली. प्रत्येकी ३ मुलींच्या राहण्याची व्यवस्था असलेल्या १२ खोल्यांचे दोन मजली इमारतीच्या हस्तांतरणासाठी सा. बां. विभागाकडून १९ ऑगस्ट २०२१ रोजी विचारणा झाली. मात्र, पिण्याचे पाणी, फर्निचर, सुरक्षा भिंत बांधल्यावरच ते ताब्यात घेऊ, असा पवित्रा महाविद्यालयाने घेतला. फर्निचरसह इतर साधन सामग्रीसाठी निधी मिळत नसल्याने महाविद्यालयाने स्वीय प्रपंची खात्यातून १४ लाखांच्या खर्चाची तयारी दर्शवली. मात्र, परवानगीच मिळाली नाही. सुरक्षा भिंत, पाणी साठवण्याच्या टाकीसाठी सप्टेंबर २०२१ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, अजून सा. बां. ने हे काम सुरू केले नसल्याने दोन मजली इमारत, रेक्टर हाउस तयार असतानाही सारे काही ठप्प आहे.

साैरऊर्जा पॅनलची दुरवस्थामध्यंतरी काही महिन्यांसाठी विधी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींना हे वसतिगृह देण्यात आले. विधी विद्यापीठाने त्यांनी फर्निचरसह इतर व्यवस्था केली. मात्र, त्या विद्यार्थिनी तेथून गेल्यावर ते कुलूपबंद आहे. गच्चीवरील सोलर पॅनल बंद पडले आहे.

वसतिगृह सुरु करा मी नाशिकहून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकण्यासाठी आले. जवळपास राहण्याची व्यवस्था नसल्याने मुलींना अडचणीचे होते. खर्च झेपत नाही. वसतिगृह सुरक्षिततेसाठी योग्य ठरेल.- निकिता मोरे, बी. फार्मसी, प्रथम वर्ष विद्यार्थिनी

यावर्षी तरी वसतिगृह मिळावेआठ वर्षांपासून तयार असलेले वसतिगृह अडगळीत पडले आहे. ते विरोधी पक्षनेत्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी या शैक्षणिक वर्षात विद्यार्थिनींना वसतिगृह उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. सा. बां. विभाग, तंत्रशिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत आहोत.-डाॅ. रामप्रसाद नागरे, अध्यक्ष, डाॅक्टर ऑफ फार्मसी युनियन

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद