शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आज संभाजीनगरची घोषणा होणार? मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळी प्रथमच संभाजी महाराजांचा पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 14:59 IST

शहराचे संभाजीनगर हे नाव स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी काळ्या दगडावर मारलेली भगवी रेघ आहे.

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज होणाऱ्या सभास्थळी संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आला आहे. शिवसेनेच्या सभास्थळी प्रथमच संभाजी महाराजांचा पुतळा दिसल्याने शहर नामकरणाबाबत मुख्यमंत्री काही घोषणा करतात का याची उत्सुकता आहे. यावर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया देत, शहराचे संभाजी नगर हे नाव म्हणजे स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी काळ्या दगडावर मारलेली भगवी रेघ आहे, असे स्पष्ट केले. तसेच आम्ही सर्व शहराचा संभाजीनगर असाच करतो. प्रशासकीय प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असा दावाही देसाई यांनी यावेळी केला. 

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण ताकदीने पहिल्यांदाच मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आज सायंकाळी सभा होत आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेला ८ जून रोजी ३७ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने होणाऱ्या हिंदुत्वाचा हुंकार या घोषवाक्यासह सभेचा प्रचार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेच्या माध्यमातून भाजप, मनसे आणि एमआयएमवर हल्ला चढवणार असा अंदाज आहे. मात्र, यापूर्वीच शिवसेनेच्या सभास्थळी प्रथमच छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आल्याने शहर नामकरणाची आज मुख्यमंत्री घोषणा करणार का? याबाबत चर्चा सुरु आहे. 

याबाबत सभास्थळाची पाहणी करण्यास आलेले उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, शहराचे संभाजीनगर हे नाव स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी काळ्या दगडावर मारलेली भगवी रेघ आहे. आम्ही सर्वजण शहराचा उल्लेख संभाजीनगर असाच करतो. मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रशासकीय बाबतीत काय कमतरता आहे. याचा आढावा घेतला आहे. लवकरच शहर नामकरण होईल, असा दावा केला.

मुख्यमंत्री ठाकरी भाषेत समाचार घेणार शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठ्या कालखंडानंतर सभा होत आहे. सभेत मुख्यमंत्री ठाकरी भाषेत सर्व विरोधकांचा समाचार घेतील. सभेला प्रचंड गर्दी होणार असून शिवसैनिकांमुळे सभास्थळ ओसंडून वाहील. सर्वांना सभेचा आस्वाद घेता यावा यासाठी शहरातील तीन ठिकाणी खुल्या जागेत मोठ्या पडद्याची सोय करण्यात आली आहे. तिथे बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून पडद्यावर सभा लाईव्ह दिसले. ही सभा शिवसेनेचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडेल अशी होईल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे