शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षपदी लागणार विद्यमान आमदारांची वर्णी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 16:02 IST

दोन्ही पदांवर जिल्ह्यातील विद्यमान आमदारांची वर्णी लागणार असल्याचे समोर येत आहे.

ठळक मुद्दे३० डिसेंबर रोजी निवड होण्याची शक्यतापदाधिकाऱ्यांत प्रचंड अस्वस्थता

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यासाठी स्थानिक आणि प्रदेश पातळीवर खल करण्यात येत आहे. या दोन्ही पदांवर जिल्ह्यातील विद्यमान आमदारांची वर्णी लागणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संघटनात्मक फेरबदलासाठी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक डिसेंबरच्या सुरुवातीलाच घेतली होती. तेव्हा त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीपर्यंत नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील, असे स्पष्ट केले होते. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती २५ डिसेंबर रोजी झाली, तरीही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. स्थानिक पदाधिकाऱ्यांचे एकमत होत नसल्यामुळेच नियुक्त्या रखडल्या आहेत. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार असल्यामुळे अनेकांना शहराध्यक्षपदाचे वेध लागले आहेत. यात विद्यमान अध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह पूर्वचे आमदार अतुल सावे, राज्य प्रवक्ते शिरीष बोराळकर, संजय केणेकर यांची नावे चर्चेत आहेत.

येत्या वर्षात मराठवाडा पदवीधरची निवडणूक होणार असल्यामुळे त्याठिकाणी शिरीष बोराळकर हे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे त्यांना शहराध्यक्ष या पदात न अडकवता मराठवाडाभर फिरण्यास वेळ देण्यात यावा, असाही युक्तिवाद केला जात आहे. तर आ. सावे यांचेही नाव चर्चेत आले आहे.  त्याच वेळी औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी वैजापूरचे दिनेश परदेशी, कन्नडचे संजय खंबायते आणि फुलंब्री मतदारसंघातील विजय औताडे यांच्या नावासह गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांचे नाव पुढे आले आहे. या पदासाठी आ. बंबही इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीणच्या अध्यक्षपदी आमदारांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झाल्याचे भाजपच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

संघटना बांधणीचे प्रयत्नभाजपमध्ये लोकप्रतिनिधींकडेच शहर आणि जिल्ह्यातील पक्षाची धुरा सोपविण्याचा विचार प्रदेशस्तरावर सुरू आहे. यातून पक्षाला सतत विविध उपक्रम देणे, कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे. सत्ता नसल्यामुळे हा विचार चर्चेतून समोर आला आहे. 

नियुक्त्या ३० डिसेंबरपर्यंत भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ३० डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षपदासाठी विविध नावांवर चर्चा सुरू आहे. प्रदेश पातळीवरून योग्य तो निर्णय घेतला जाईल. जो निर्णय होईल, तो सर्वांनाच मान्य असणार आहे.- शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भाजप

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादAtul Saveअतुल सावे