शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

दुष्काळासाठी निधी कमी पडणार नाही; आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:28 IST

शेतकरी हा प्रमुख घटक असून, दुष्काळासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ठळक मुद्दे जीएसटीमधून १ लाख १५ हजार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. शेतकऱ्यांना १६ हजार ९५ कोटी दिले

औरंगाबाद : राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. शेतकऱ्यांना १६ हजार ९५ कोटी रुपये दिले. शेतकरी हा प्रमुख घटक असून, दुष्काळासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुनगंटीवार यांनी विभागीय आयुक्तालयात १५० वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. तत्पूर्वी त्यांनी मराठवाडा विकास मंडळ सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शासनाकडे विकासकामांसाठी पुरेसा निधी नाही, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही, अशी टीका दोन दिवसांपूर्वीच्या भाषणात केली. यावर अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले, त्यांनी अशी टीका करणे चुकीचे आहे.

राज्यात सिंचनासाठी १३ हजार कोटींचा निधी दिला आहे. शेतकऱ्यांना सरकारने सर्वाधिक मदत केली आहे. जीएसटीमधून १ लाख १५ हजार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे यावेळी दुष्काळासाठी निधी कमी पडणार नाही. केंद्र शासनाकडे देखील आवश्यक निधीची मागणी केली जाणार आहे. राज्यात कापसाच्या पिकावर बोंडअळीचे संकट आले होते, त्यावेळी केंद्र सरकारकडे मदत मागितली. मात्र, निधी मिळाला नाही. शासनाने स्वत: ३ हजार कोटींची तरतूद केली. कर्जमाफीमुळे पुरेसा निधी नसल्याची टीका केली जात होती; परंतु विरोधक गैरसमज निर्माण करीत असल्याचा टोला त्यांनी लगावला. असे असतानाही लोकसभा आणि विधानसभेत शिवसेना-भाजप युती होईल, असा दावा त्यांनी केला. 

मराठवाडा विकास मंडळाच्या कामावर ताशेरेमराठवाडा विकास मंडळाच्या सदस्यांसोबत अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि त्यांना लागणारा निधी याबाबत आढावा घेतला. बैठकीत सगळी माहिती अर्धवट असल्याचे पाहून अर्थमंत्र्यांनी सदस्यांसह सर्व अधिकाऱ्यांची खरडपट्टी करीत ताशेरे ओढले. ४१ बैठका घेतल्याचे मंडळाचे सचिव डी.एम. मुगळीकर यांनी सांगताच, अर्थमंत्री म्हणाले, एवढ्या बैठका घेतल्या. मात्र, त्याचा फायदा काय झाला. योजनांसाठी संशोधन करा, त्या नीट आखून संबंधित विभागाकडून त्याचे प्रस्ताव पाठविल्यास निधीची तरतूद होते. नियमाने जोपर्यंत प्रस्ताव येणार नाही, तोपर्यंत निधी देता येणार नाही, असेही अर्थमंत्र्यांनी अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्यासह सर्व सदस्य, अधिकाऱ्यांना सुनावले. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारdroughtदुष्काळfundsनिधी