शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

मराठवाड्याच्या संतभूमीला एक‘नाथ’ पावणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 15:40 IST

अनेक प्रकल्पांना निधीची प्रतीक्षा; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नावातच ‘नाथ’ असलेल्या या एकनाथांकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसह अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

राज्यातील सत्तांतरात मराठवाड्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या दोन मंत्र्यांसह नऊ आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले. मुख्यमंत्र्यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमपत्रिकेवर नजर टाकली तर बंडखोर आमदारांना पाठबळ देण्यासाठीच या दौऱ्याची आखणी करण्यात आल्याचे दिसून येते; परंतु, मुख्यमंत्र्यांनी या भागातील विकासविषयक प्रश्न मार्गी लावावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.  मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला या सरकारने मुदतवाढ दिली आहे. आता या मंडळावरील संचालक मंडळाची नियुक्ती करावी.

कालबद्ध विकासाचा कार्यक्रम ठरला ‘कालबाह्य’ संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडा बिनशर्त सामील झाला. मात्र नागपूर करारातील अटींची पूर्तता राज्य सरकारने न केल्यामुळे या प्रदेशाचे मागासलेपण  दूर झालेले नाही. मराठवाड्यात दरवर्षी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणे अपेक्षित असताना गेल्या पाच वर्षांत या बैठकीला मुहूर्त मिळालेला नाही. मागील १३ वर्षांत  फक्त दोन बैठका झाल्या. ४ ऑक्टोबर २०१६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलेला मराठवाड्याच्या विकासाचा ५० हजार कोटींच्या तरतुदींचा कालबद्ध कार्यक्रम अंमलबजावणीअभावी ‘कालबाह्य’ ठरला आहे.  

तरतूद मोठी, गंगाजळी छोटीमराठवाड्यातील अनेक सिंचन प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. ३८ छोट्या-छोट्या प्रकल्पांसाठी १०४८ कोटी देण्याची घोषणा झाली होती पैकी छदामही मिळाला नाही. लोअर दुधना प्रकल्प निधीसाठी ३८ वर्षे रखडला. ३६ हजार ५०० विंधन विहिरींपैकी फक्त सध्या ७ हजार विहिरींची कामे झाली. कृष्णा खोऱ्यात सध्या जे पाणी उपलब्ध आहे, ते मराठवाड्याला मिळण्यासाठी ४ हजार ८०० कोटींच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली होती.  परंतु अजूनही  २१ टीएमसी पाणी पूर्ण क्षमतेने मराठवाड्याला मिळत नाही.  

बीड-परळी रेल्वेमार्गाची कासवगतीनगर-परळी व वर्धा-नांदेड या दोन रेल्वेमार्गांसाठी ५ हजार ३२६ कोटींची तरतुदीची घोषणा केली. त्यातील नगर-बीड- परळी हा मार्ग मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईल असे जाहीर केले होते. अद्याप हे काम पूर्ण झाले नाही.

धावपट्टीचा विस्तारऔरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाला मान्यता देण्यात आली. यासाठी ५५० कोटी रुपयांचा खर्च भूसंपादनासाठी लागणार आहे. मात्र केंद्र सरकारने त्यासाठी राज्य सरकारकडे बोट दाखविले आहे. दोन सरकारच्या वादात काम रखडले आहे.

औरंगाबादकरांना पाणी द्याशहराला पाणीपुरवठा करणारी १९७५ ची जुनी जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे नवीन जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यासाठी २०० कोटी रुपये लागणार आहे.

या प्रकल्पांकडे लक्ष द्याn    डीएमआयसीत भांडवली गुंतवणुकीचे उद्योगn    लातूरकरांना उजनीचे पाणी द्याn    परभणी, बीड, नांदेड येथे टेक्स्टाईल पार्क n    जालना येथे सीड पार्क स्थापन करणेn    शेळीगट व संकरित गायी पायलट प्रोजेक्ट n    मराठवाडा वॉटर ग्रीड योजना ठप्प n    पश्चिमी वाहिन्यांचे पाणी मराठवाड्याकडेn    नांदेड - औरंगाबाद रस्ता चौपदरीकरण

 

 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादChief Ministerमुख्यमंत्री