शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नामांतर विरोधात रस्त्यावर उतरून जनआंदोलन, कायदेशीर लढाईसाठी उगारणार वज्रमूठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 15:30 IST

नामांतराच्या मुद्यावर जनआंदोलन; सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा ठराव मंजूर केला. या निर्णयाच्या विरोधात मंगळवारी सुभेदारी विश्रामगृह येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत सर्वानुमते जनआंदोलनाचा ठराव मंजूर करण्यात आला. लवकरच सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात येईल. समिती पुढील आंदोलनाची दिशा ठरवेल, अशी घोषणा खा. इम्तियाज जलील यांनी केली.

औरंगाबादच्या नामांतराला कडाडून विरोध होतोय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे राजीनामे सादर केले. खा. इम्तियाज जलील यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुभेदारी येथे घेतली. बैैठकीस विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यापूर्वी शहराचे नाव बदलण्याचा प्रयत्न झाला. कायदेशीर लढाईच्या माध्यमातून नामांतर थांबविण्यात आले. आता पुन्हा नामांतर थांबविण्यासाठी रस्त्यावर उतरून जनआंदोलन, कायदेशीर लढाई लढावी, असा सल्ला देण्यात आला.शेवटी जलील यांनी नमूद केले की, संभाजी महाराजांबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे. नामांतर हा विषय हिंदू-मुस्लिम असा अजिबात नाही. शहरावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी हा विषय जिव्हाळ्याचा आहे. माझ्या जन्म प्रमाणपत्रावर औरंगाबाद आहे, तर मृत्यू प्रमाणपत्रावरही औरंगाबादच पाहिजे. सध्या लोकशाही नसून हुकूमशाहीच दिसून येते. आपली ताकद दाखविण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे का, असा प्रश्न त्यांनी केला. उपस्थितांनी हात उंचावून होकार दिला. एकदा आपण न्यायालयात पराभूत झालो तर काहीच शक्य होणार नाही. त्यामुळे खूप काळजीपूर्वक लढा द्यावा लागेल, असे नमूद केले.

बैठकीस इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख, माजी महापौर रशीद मामू, माजी नगरसेवक अफसर खान, मोहसीन अहेमद, मीर हिदायत अली, अश्फाक सलामी, गौतम खरात, इलियास किरमाणी, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, पवन डोंगरे, फेरोज खान, एजाज झैदी, किशोर थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ठराव शासनाला पाठविणारऔरंगाबाद औद्योगिक केंद्र व जागतिक पातळीवर पर्यटनस्थळांमुळे प्रसिद्ध आहे. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत नामांतराला विरोध दर्शविणारा ठराव मंजूर केला. या ठरावाची प्रत शासनाला पाठविण्यात येणार आहे. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद