शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

भाजपचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 6:06 PM

विद्यमान शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.

ठळक मुद्देयेत्या काही महिन्यांतच शहरातील महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये शहराध्यक्ष बनण्यासाठी स्पर्धा

औरंगाबाद : राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या नवीन कार्यकारिणीसाठी बैठकांवर बैठका घेण्यात येत आहेत. संघटनात्मक बांधणीसह नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी बैठक घेतल्यानंतर भाजपचा शहराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोण होणार या चर्चांना उधाण आले आहे. विद्यमान शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.

भाजपच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, माजी विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीला माजी राज्यमंत्री आ. अतुल सावे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना केल्या. यामध्ये बुथ समिती, मंडळ नेमणुका केल्यानंतर शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, यासाठी बुथ समितीचे गठन लवकर केले जावे, असे आदेशही दिले.

या बैठकीनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नवीन शहराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोण होणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे. येत्या काही महिन्यांतच शहरातील महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यावेळी शहराध्यक्षाला प्रचंड महत्त्व असणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये शहराध्यक्ष बनण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. शहराध्यक्ष पद हे पक्षातील निष्ठावंत व्यक्तीला मिळणार असल्याचा दावा भाजपतील काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निष्ठावंत आणि इतर पक्षातून भाजपात आलेल्यांमध्ये गटबाजी होण्याची शक्यता आहे.

अगोदर युती, आता कोणती आघाडी होणार?नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने युतीच्या नावावर मते मागितली. मतदारांनाही शहारातील तिन्ही जागांवर युतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान केले. मात्र आता शिवआघाडीऐवजी दुसरीच आघाडी शिवसेनेने केली असल्याचा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला. तसेच येत्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाElectionनिवडणूक