शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परस्त्रीसोबत हॉटेलमध्ये गप्पा मारणार्‍या पतीला पत्नीने बदडले; औरंगाबादच्या सिडको बसस्थानक परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 19:31 IST

परस्त्रीसोबत हॉटेलमध्ये गप्पा मारत बसलेल्या नवर्‍याला दामिनी पथकाच्या मदतीने पत्नीने चांगलाच हिसका दाखविला. हॉटेलमध्ये अचानक झालेल्या  या प्रकाराने तेथील कर्मचार्‍यांसह ग्राहकही आश्चर्यचकित झाले. ही घटना सिडको बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये आज दुपारी घडली.

औरंगाबाद : परस्त्रीसोबत हॉटेलमध्ये गप्पा मारत बसलेल्या नवर्‍याला दामिनी पथकाच्या मदतीने पत्नीने चांगलाच हिसका दाखविला. हॉटेलमध्ये अचानक झालेल्या  या प्रकाराने तेथील कर्मचार्‍यांसह ग्राहकही आश्चर्यचकित झाले. ही घटना सिडको बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये आज दुपारी घडली.

या विषयी प्राप्त माहिती अशी की, जयभवानीनगर येथे राहणारा ३५ वर्षीय सुशील(नाव बदलले) हा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. पुंडलिकनगर रोडवर त्याचे  कार्यालय आहे. विविध कंपन्यांना तो कामगार पुरविण्याचे काम करतो. काही दिवसापूर्वी रत्ना नावाची (नाव बदलेले)एक तरूणी त्याच्याकडे नोकरी मागण्यासाठी आली होती. त्या तरूणीला त्याने त्याच्या कार्यालयातच नोकरीला ठेवले. गेल्या काही दिवसापासून रत्नासोबत त्याची मैैत्री वाढली. 

आज दुपारी २ वाजेच्या सुमारास सुशील रत्नाला घेऊन सिडको बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये गेला. तेथे दोघे गप्पा मारत असल्याची माहिती त्याच्या पत्नीला समजली. यामुळे त्याची पत्नी संतप्त झाली आणि त्यास धडा शिकविण्यासाठी त्याने थेट दामिनी पथकाची मदत घेण्याचे ठरविले. सुशील परस्त्रीसोबत हॉटेलमध्ये असल्याची तिने खात्री केली आणि दामिनी पथकाला फोन करून बोलावून घेतले. दामिनी पथकाच्या महिला पोलिसांना सोबत घेऊन तिने थेट सुशील आणि रत्नावर हल्लाबोल केला.यावेळी  सुशीलला तिने पोलिसांसमोरच बदडून काढले. एवढेच नव्हे तर रत्नालाही खडेबोल सुनावले. यानंतर दामिनी पथकाच्या वाहनातून सुशील आणि रत्नाला एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे या घटनेची नोंद करण्यात आली. 

परस्त्रीयांना सतत बाहेर हॉटेलमध्ये नेऊन मजा करण्याच्या सवयीचा सुशील आहे. याविषयी त्याच्या पत्नीला अनेकदा तक्रारी आल्याने तिने त्याची समजूतही काढली होती.मात्र सुशीलचा बाहेरख्यालीपणा कमी होत नसल्याने आज त्याच्या पत्नीने दामिनी पथकाला सोबत घेऊन हिसका दाखविल्याचे एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले. हा कौटुंबिक वादाचा प्रकार असल्याने सुशीलचे घर पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तेथे तक्रार नोंदविण्याचे त्याच्या पत्नीला सांगण्यात आले. शिवाय रत्नानेही तक्रार नोंदविण्यास नकार दिला.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद