शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

पदावर पत्नी अन् रुबाब राणाचा !

By admin | Updated: May 29, 2017 00:21 IST

बीड : जिल्हा परिषदेत आणि त्यांच्याच भाजप पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्याचा पती आपणच सदस्य असल्याचा रूबाब गाजवत सर्वत्र मिरवत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ज्या जिल्ह्यात पालकमंत्री पंकजा मुंडे महिलांना पुढे येऊ द्या, अशी हाक देतात. जिल्हा परिषदेच्या अध्यपदाची जबाबदारी महिलेकडे देऊन याची अंमलबाजवणी झाल्याचे दाखवितात. त्याच जिल्हा परिषदेत आणि त्यांच्याच भाजप पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्याचा पती आपणच सदस्य असल्याचा रूबाब गाजवत सर्वत्र मिरवत आहे. रुबाबात फिरणारा हे दुसरा-तिसरा कोणी नसून विद्यार्थिनींची छेड काढल्याप्रकरणी मारहाण झालेला बीडमधील विठाई नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य राणा डोईफोडे आहे.जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बंधू तथा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर मात करीत जि.प.वर झेंडा फडकाविला होता. परंतु जनेतेने निवडून दिलेल्या आणि जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम करणाऱ्या महिलांना आजही स्वातंत्र्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यांचे पतीच राज करीत असल्याने महिला केवळ नामधारी राहिल्याचे दिसून येत आहे.अशातच विठाई महाविद्यालयाचे प्राचार्य असलेले राणा डोईफोडेवर महाविद्यालयातील विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून त्यांची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. हेच राणा डोईफोडे सध्या भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पत्नी सारिका डोईफोडे या पाली जि.प. गटाच्या सदस्या आहेत. निवडणुकीपासून राणा डोईफोडे हे आपण सदस्य असल्याचा आव आणत थाटामाटात जि.प. कार्यक्षेत्रात फिरत आहेत.कुठलाही कार्यक्रम असो अथवा बॅनरबाजी असो, त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा सदस्य असा उल्लेख करून प्राचार्य डोईफोडे आपला फोटो लावतो.विशेष म्हणजे याच फोटोवर पालकमंत्र्यांसह खासदार, आमदारांचेही फोटो असतात. पत्नी सदस्य आणि बॅनरवर नाव मात्र प्राचार्य डोईफोडे याचे असूनसुद्धा याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही.संघटनांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधराणा डोईफोडे याच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच विठाई नर्सिंग महाविद्यालयाची कसून चौकशी करण्यात यावी, येथील विद्यार्थिनींना दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश देण्यात यावा, विद्यार्थिनींना संरक्षण देण्यात यावे, सर्व मुलींचे जबाब न्यायाधिशांसमोर नोंदविण्यात यावेत, डोईफोडेवर गंभीर गुन्हे नोंद करावेत यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी दुपारी १२ वाजता विद्यार्थी संघटनांसह इतर सामाजिक संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत.शैक्षणिक क्षेत्रात खळबळशैक्षणिक क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असतानाही राणा डोईफोडे याच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे. महाविद्यालयात कमी अन् राजकीय पुढाऱ्यांसोबतच जास्त असतात, अशी चर्चा बीडमध्ये दबक्या आवाजात भाजपच्याच कार्यकर्त्यामध्ये ऐकावयास मिळत आहे.