शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनचे टेन्शन कशाला?; पोस्टातून मिळेल महिन्याला उत्पन्न

By साहेबराव हिवराळे | Updated: March 21, 2024 18:36 IST

पोस्टाची मासिक उत्पन्न बचत योजना ठरतेय लाभदायी; गुंतवणूकही वाढली

छत्रपती संभाजीनगर : पोस्टाची गुंतवणूक अधिक सुरक्षित वाटू लागल्याने बँकांप्रमाणेच पोस्टात खाते उघडून गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. पोस्टाने पती-पत्नीसाठी सुरू केलेली मासिक उत्पन्न बचत योजनादेखील लाभदायी ठरली असून, या योजनेतील गुंतवणुकीकडे कल वाढला आहे.

टपाल कार्यालयाकडून सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ बचत खाते, महिला सन्मान बचतपत्र योजना, अपघाती विमा योजना, मासिक उत्पन्न बचत अशा अनेक योजना राबविल्या जातात. यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे मासिक उत्पन्न बचत खाते. या योजनेंतर्गत पती-पत्नीला पोस्टात वैयक्तिक किंवा संयुक्त खाते उघडून एकरकमी गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवर त्यांना दरमहा अथवा वार्षिक उत्पन्न मिळू शकते.

वैयक्तिक : मासिक उत्पन्न योजनेत पती अथवा पत्नीला वैयक्तिक खाते उघडता येते. या खात्यात गुंतवणुकीची मर्यादा ९ लाख रुपये आहे.

किती वर्षांसाठी गुंतवणूकवैयक्त्तिक व संयुक्त खात्यात गुंतवणुकीची मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. पाच वर्षांसाठीच या खात्यात गुंतवणूक करता येते.संयुक्त : पती-पत्नी अथवा अधिकाधिक तीन व्यक्ती एकत्र येऊन संयुक्त खाते उघडू शकतात. यात १५ लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते.

काय आहे पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना?पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना एक सरकारी बचत योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास नियमित मासिक उत्पन्न मिळते. एका खात्यात अधिकाधिक ९ लाख रुपये तर संयुक्त खात्यात १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

दोन प्रकारची खातीकिती गुंतवणूक केली तर किती मिळतात?- वैयक्तिक खात्यात ९ लाख रुपये भरता येतात. या रकमेवर वार्षिक ७.४ टक्के इतके व्याज दिले जाते. पाच वर्षांनंतर या गुंतवणुकीवर मासिक ५५०० तर वर्षाला ६६ हजार रुपये व्याज मिळते.- संयुक्त खात्यात गुंतवणुकीची कमाल मर्यादा १५ लाख रुपये आहे. पाच वर्षांनंतर गुंतवणुकीवर मासिक ९२५० तर वर्षाला १ लाख ११ हजार रुपये व्याज मिळते. ही योजना सर्वसामान्य ग्राहकांसाठी फायदेशीर आहे.

नागरिकांचा कल वाढू लागलापोस्ट ऑफिसकडून नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मासिक उत्पन्न बचत योजना त्यापैकीच एक. या योजनेंतर्गत वैयक्तिक व संयुक्त खाते उघडता येऊ शकते. एकरकमी गुंतवणुकीवर महिन्याला उत्पन्न मिळत असल्याने या योजनेत खाते उघडून गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे.- जी. हरि प्रसाद, प्रवर डाक अधीक्षक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPost Officeपोस्ट ऑफिस