शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी?
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
4
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
5
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
6
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
7
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
8
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
9
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
10
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
11
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
12
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
13
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
15
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
16
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
17
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
18
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
19
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
20
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे

रजिस्ट्री होताच मालमत्ता कर का लागत नाही? दरवर्षी हजारो मालमत्तांची छत्रपती संभाजीनगरात भर

By मुजीब देवणीकर | Updated: May 30, 2025 15:15 IST

मालमत्ता कर दोन ते तीन वेळेस लावणे, घराला व्यावसायिक कर अशा हजारो तक्रारी वॉर्ड कार्यालयांकडे येतात.

छत्रपती संभाजीनगर : रजिस्ट्री कार्यालयात दररोज शेकडोंच्या संख्येने मालमत्तांची खरेदी-विक्री होते. या व्यवहाराच्या आधारावर मालमत्ता करात आपोआप नामांतर होणे, नवीन घर, प्लॅट असेल तर कर लागायला हवा. असे न होता मालमत्ताधारकांना महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. महापालिकेच्या सर्व वॉर्ड कार्यालयात सहजासहजी कर लावून मिळत नाही, हे विशेष.

शहर चारही दिशांनी झपाट्याने वाढत आहे. जुनी, नवी घरे, प्लॉटची विक्री वर्षभर होते. हे सर्व व्यवहार रजिस्ट्री कार्यालयात होतात. महिन्याला एक हजारावर व्यवहार होतात. या व्यवहाराच्या आधारावर महापालिकेत नवीन मालमत्तेला कर लागला पाहिजे. मात्र, नागरिकांना वॉर्ड कार्यालयात चकरा माराव्या लागतात. कर लावून घेणे आणि नामांतर ही अत्यंत जटिल प्रक्रिया करून ठेवण्यात आली आहे.

हजारो तक्रारीमालमत्ता कर दोन ते तीन वेळेस लावणे, घराला व्यावसायिक कर अशा हजारो तक्रारी वॉर्ड कार्यालयांकडे येतात. मात्र, लवकर निरसन होत नाही. अनेक मालमत्ताधारक मनपाच्या कारभाराला कंटाळून करच भरत नाहीत.

करदात्यांची संख्या वाढतेयवर्षे----------एकूण मालमत्ता------------वाढ किती?२०२०-२१------२,७०,९३४-------------------२०२१-२२------२,८३,००७--------------१२,०७३

२०२२-२३------२,९१,२६७---------------८,२६०२०२३-२४------३,०५,७३३--------------१४,४६६

केस-१चिकलठाण्यातील प्राइड फिनिक्समध्ये डी- ७१३ मध्ये राहणारे पंडित सुरसे सहा महिन्यांपासून कर लावून द्या म्हणून वॉर्ड कार्यालयात चकरा मारत आहेत. कर लावण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. पैसे न दिल्याने कर लावून दिला नाही.

केस-२भावसिंगपुरा येथील बाळासाहेब भाऊराव भोसले यांना एकाच मालमत्तेला तीनदा कर लावला. A0004610 या मालमत्तेचा ते करही भरत आहेत. मागील काही महिन्यांपासून ते वारंवार मनपा कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत; पण मनपा अधिकारी, कर्मचारी काही करात दुरुस्ती करून देत नाहीत.

केस-३मछली खडक येथील एक व्यावसायिक स्वत:च्या मालमत्तेचा कर दरवर्षी एप्रिल महिन्यात प्रामाणिकपणे भरतात. त्यांच्या मालकीची प्रॉपर्टी नसलेल्या इमारतीला त्यांच्या नावाने कर लावला. सहा महिन्यांपासून ते अर्ज करीत आहेत. मात्र, निर्णयच होईना.

डेटा मिळवतोय...महापालिकेचे करमूल्य निर्धारण अधिकारी विकास नवाळे यांनी सांगितले की, रजिस्ट्री कार्यालयाकडून डेटा मिळवून त्यावर कर लावण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. रजिस्ट्री कार्यालयाला पत्रही दिले आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरTaxकरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका