शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

परतीच्या पावसाची भीती कशाला? जुना ट्रेंड पुन्हा, यंदा दिवाळीत 'वॉटरप्रूफ आकाशकंदील'ची धूम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:13 IST

जुना ट्रेंड परतला! १९९० च्या जिलेटीन पेपरचा पारदर्शक आकाशकंदील नव्या रूपात आला

छत्रपती संभाजीनगर : यंदा झालेल्या पावसाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. आता पावसा नको, असे म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र, हवामान खात्याकडून येणाऱ्या बातम्यांनुसार यातील परतीचा पाऊस येत्या दिवसांत जोर धरणार आहे. या पावसात आकाशकंदील भिजून खराब होऊ नये व दिवाळीच्या आनंदावर विरजण पडू नये, यासाठी बाजारात वॉटरप्रूफ आकाशकंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

वॉटरप्रूफ आकाशकंदील, तेही ‘मेड इन वाळूज’चक्रीवादळाचा धोका टळला तरी यंदा परतीचा पाऊसही जोरदार राहिला. या व्यावसायिक संधीचा उपयोग करत वाळूज येथील डायपॅचिंगमध्ये काम करणाऱ्या काही उद्योगांनी पीव्हीसी मटेरियलमधील आकाशकंदील बाजारात आणले आहेत. त्यात २६ प्रकार आहेत. आकाशकंदील ८० ते ३०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत.

राजस्थानचा राजवाडी आकाशकंदील आकर्षणराजस्थानमधून बांधणी, जरदोजी वर्क असलेले कापडी आकाशकंदील नाविन्यपूर्ण ठरत आहेत. याशिवाय फोटोफ्रेममधील राजवाडी आकाशकंदील ग्राहकांना आकर्षित करत आहेत. कारण, टू इन वन असा वापर या आकाशकंदिलांचा आहे. १ हजार ते २५०० रुपयांदरम्यान हे आकाशकंदील विकले जात आहेत.

देवतांचे छायाचित्र असलेले आकाशकंदीलमागील दोन वर्षांपासून देव-देवतांचे छायाचित्र असलेल्या आकाशकंदिलांनाही मागणी आहे. यातही एमडीएफ मटेरियलचा वापर केला आहे. काही आकाशकंदील थ्रीडी आहेत. राधाकृष्ण, श्रीराम, विठ्ठल रुखमाई, दगडूशेठ हलवाई गणेशमूर्ती, स्वामी समर्थ, गजानन महाराज यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचे छायाचित्र असलेले आकाशकंदील आहेत.

जिलेटीन पेपरचा जुना ट्रेंड पुन्हा आला१९९० च्या आधी जिलेटीन पेपरचा वापर करून पारदर्शक असे आकाशकंदील तयार केले जात होते. पण, नंतर फॅन्सी आकाशकंदिलांनी सर्व ट्रेंड बदलून टाकला. आता जुना ट्रेंड पुन्हा आला असून, नवीन रूपात जिलेटीन पेपरचा आकाशकंदील बाजारात आला आहे.- राहुल गुगळे, व्यापारी

English
हिंदी सारांश
Web Title : Waterproof sky lanterns shine this Diwali amidst unseasonal rain fears.

Web Summary : Despite unseasonal rain concerns, waterproof lanterns are trending. Waluj's PVC lanterns, Rajasthan's Rajwadi designs, deity photo lanterns, and revived gelatin paper versions are available. Prices range from ₹80 to ₹2500, offering diverse festive options.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDiwaliदिवाळी 2024Marathwadaमराठवाडा