शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का ? विशेष रेल्वेच्या नावाखाली एक्स्प्रेस रेल्वेच ‘सुसाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 17:24 IST

नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी रोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांचा आता संयम सुटत आहे.

ठळक मुद्देऔरंगाबादहून आजघडीला सर्व रेल्वे विशेष रेल्वे म्हणून धावत आहेत. या रेल्वेत जनरल तिकीट बंद आहे. आरक्षित तिकिटाशिवाय प्रवाशांना प्रवास करता येत नाही.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व व्यवहार अनलाॅक झाले आहेत. मात्र, अद्यापही पॅसेंजर रेल्वे लाॅक आहेत. गेल्या १७ महिन्यांपासून विशेष रेल्वेच्या नावाखाली एक्स्प्रेस रेल्वेच धावत आहेत. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी रोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांचा आता संयम सुटत आहे. एक्स्प्रेस, एसटी, दुचाकीने रोज ये-जा करणे, हे आर्थिकदृष्ट्या परवड नसल्याने पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी पॅसेंजर रेल्वे आवश्यक आहेत. औरंगाबादहून आजघडीला सर्व रेल्वे विशेष रेल्वे म्हणून धावत आहेत. या रेल्वेत जनरल तिकीट बंद आहे. आरक्षित तिकिटाशिवाय प्रवाशांना प्रवास करता येत नाही. आरक्षण तिकिटासाठी अधिक रक्कम मोजण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. काही दिवसांपूर्वीच नांदेड-रोटेगाव डेमू आणि रोटेगाव-नांदेड डेमू रेल्वे सुरू करण्यात आली. त्यामुळे अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु या रेल्वेची वेळ गैरसोयीची ठरत आहे. ही वेळ बदलण्यासह सर्व पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे.

बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वेऔरंगाबादमार्गे धावणाऱ्या निजामाबाद-पुणे पॅसेंजर, नांदेड-दौंड पॅसेंजर, काचीगुडा-नगरसोल पॅसेंजर, जालना-नगरसोल डेमू पॅसेंजर बंद आहे.

सुरू असलेल्या एक्स्प्रेससध्या सचखंड एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, अजंता एक्स्प्रेस, रेणीगुंठा एक्स्प्रेस, मराठवाडा एक्स्प्रेस धावत आहेत.

बंद असलेली एक्स्प्रेसऔरंगाबादमार्गे धावणारी चेन्नई एक्स्प्रेस सध्या बंद आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यातून धावणारी, दक्षिण भारताशी कनेक्टिव्हिटी देणारी ही रेल्वे सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे संतोषकुमार सोमाणी यांनी केली.

मागणी असेल तेथे वाढविल्या जातीलप्रत्येक सेक्शनमध्ये एक पॅसेंजर चालेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. मागणी असेल तेथे पॅसेंजर वाढविल्या जातील. मात्र, कोविडची परिस्थिती आणि गाईडलाईनवरून यासंदर्भात निर्णय घेतले जातील.- उपिंदर सिंग, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड, दमरे

विद्यार्थ्यांची गैरसोयपॅसेंजर रेल्वे बंद असल्याने औरंगाबादला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सकाळच्या वेळेत औरंगाबादेत पोहोचण्यासाठी पूर्वीच्या पॅसेंजर लवकरात लवकर सुरू केल्या पाहिजे.-प्रीती जैस्वाल, प्रवासी

पॅसेंजर सुरू कराएसटीने विशेष रेल्वेने ये-जा करणे परवडणारे नाही. दुचाकीने प्रवास करताना वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका असतो. त्यामुळे रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी पॅसेंजर पुन्हा सुरू कराव्यात.- अक्षय वायकोस, प्रवासी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनRailway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वे