शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूकीसाठी कोण कुणाचा मित्र...समजणे सध्या तरी अवघड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 19:56 IST

औरंगाबादेत सध्या कालचे भाऊ, आजचे वैरी झाले असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देराज्यात महाविकास आघाडी असल्याने सारेच अनुत्तरीत 'आप'सुद्धा संधीच्या शोधात

औरंगाबाद : युद्धात, प्रेमात आणि राजकारणात सारेकाही माफ असते, असे म्हटले जाते. औरंगाबाद मनपाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तारीख जाहीर व्हावयाची आहे. प्रत्येक पक्ष निवडणुकीची तयारी करीत आहे; परंतु औरंगाबादेत सध्या कालचे भाऊ, आजचे वैरी झाले असल्याचे दिसून येत आहे.

भाजप-शिवसेना एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. कालपर्यंत सत्तेतले हे पक्ष आता एकमेकांविरुद्ध उग्र टीकाटिप्पणी करीत आहेत. कालपर्यंत शिवसेनेचे विरोधक असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आज त्यांचे मित्र बनलेले आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मनसे भाजपच्या मदतीला धावून जात आहे; पण औरंगाबादेत मनसेची ताकद नसल्याचे यापूर्वीच्या मनपा निवडणुकीत दिसून आले आहे. झेंडा बदलल्यानंतर मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे औरंगाबादला येऊन गेले; परंतु समाधानकारक प्रतिसादाअभावी त्यांना दौरा आटोपता घ्यावा लागला. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची आघाडी  महाराष्ट्राने पाहिली ; परंतु लोकसभेतील वातावरण विधानसभेत दिसले नाही. दोघेही वेगवगळे झाले. आता मनपा निवडणुकीत हे पक्ष एकत्रित येतील का, ही चर्चा आहे. दिल्ली विधानसभेत यश मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीला औरंगाबाद मनपात काही कामगिरी करावी, असे वाटतेय. 

सारेच अनुत्तरितराज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यामुळे औरंगाबादेतील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जिवात जीव आलेला आहे; परंतु मनपा निवडणुकीत ही महाविकास आघाडी होते का, सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीला गरज वाटते का, हे सारेच मुद्दे सध्या अनुत्तरित आहेत.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक