शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

प्रा. राजन शिंदे यांचा मारेकरी कोण ? कुटुंबातील सदस्यांचे चौकशीत पोलिसांना असहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 11:46 IST

खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांचे पथक नेमले आहे.

ठळक मुद्देएन-२ सिडको भागात डॉ. शिंदे यांचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि.११) सकाळी उघडकीस आली

औरंगाबाद : मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन शिंदे यांच्या निर्घृण खुनाचे गूढ मंगळवारीही कायम राहिले. पोलीस पथकांना घटनेच्या ३६ तासांनंतरही कोणताही सुगावा लागला नाही. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांची सखोल चौकशी केली. चौकशीत कुटुंबातील सदस्यांनी सहकार्य केले नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

एन-२ सिडको भागात डॉ. शिंदे यांचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि.११) सकाळी उघडकीस आली. या खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांचे पथक नेमले. या पथकाने मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच चौकशीसाठी कुटुंबातील एका सदस्याला ताब्यात घेतले. त्याची तब्बल दहा तास चौकशी करून घरी सोडले. पोलिसांच्या कोणत्याही प्रश्नाचे समर्पक उत्तर या सदस्याने दिले नाही. पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने डॉ. शिंदे यांची पत्नी, बहीण व मुलीचीही कसून चौकशी केली. त्यांच्या माहितीत विसंगती आढळली. डॉ. शिंदे यांनी रविवारी घरी येण्यापूर्वी पडेगावातील एका हॉटेलवर जेवण केले. त्यांच्यासोबत आणखी दोन प्राध्यापक होते. या प्राध्यापकांसह हॉटेल मालकाचीही चौकशी करण्यात आली. त्या हॉटेलवरून डॉ. शिंदे हे मित्राला सोडण्यासाठी विद्यापीठात गेले. तेथून घरी आल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवले. उपायुक्त दीपक गिऱ्हे, निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक दत्ता शेळके, सुनील चव्हाण यांच्यासह मुकुंदवाडीचे निरीक्षक ब्रह्मा गिरी आदींनी ही चौकशी केली.

नेटफिलिक्सवर सिरीज पाहिल्यापोलिसांच्या चौकशीत डॉ. राजन हे घरी आल्यानंतर त्यांचे पाय दुखत असल्यामुळे रात्री दीड वाजेपर्यंत चेपले, त्यांच्या जवळच अडीच वाजेपर्यंत जागे होतो, असे त्यांच्या मुलाने सांगितले. रात्री १ वाजताच सर्व जण झोपी गेल्याचे पत्नीने सांगितले. एका सदस्याच्या नेट सर्चिंगमध्ये वेगवेगळ्या किलर सिरीज सर्च करणे, पाहणे, त्याविषयी काही टिपण काढल्याच्याही नोंदी सापडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पोलिसांना या प्रश्नांचे उत्तर मिळेना१) डॉ. शिंदे हे रविवारी रात्री ११.३० वाजता घरी आल्याचे त्यांच्या घरापासून तिसऱ्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. पहाटे ५.३० वाजता मुलगा घराबाहेर पडल्याचे, काही वेळाने ॲम्ब्युलन्स घरी आल्याचे सीसीटीव्हीत दिसते. त्याशिवाय कोणी बाहेरील व्यक्ती घरात गेला असता तर तोही कॅमेऱ्यात कैद झाला असता. मग, खून घरातीलच एखाद्या सदस्याने केला काय?२) मुलाने वडिलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना घरातील आई, बहीण, आजी-आजोबांना न सांगता थेट दवाखाना कशासाठी गाठला, त्याने कुटुंबीयांना माहिती का दिली नाही?३) ॲम्ब्युलन्स दारात आल्यानंतर चालक हे प्रकरण पोलिसात कळविण्याची सूचना देऊन निघून गेला. त्यानंतर मुलाने बहिणीला उठवून पोलीस चौकीत सोबत नेले; पण आईला उठवले का नाही?४) मुलीनेही वडिलांचा मृतदेह पाहून थेट भावासोबत जाणे योग्य मानले. घरातील व्यक्तींना खुनाबद्दल काहीही सांगितले नाही. तोपर्यंत आईसुद्धा झोपेतच होती. आईच्या परस्पर मुलांनी दवाखाना, पोलीस चौकी का गाठली?

पत्नीची विद्यापीठाकडे बदलीची मागणीडॉ. शिंदे यांच्या हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी डॉ. मनीषा यांनी मुलीसह विद्यापीठाचे कुलगुरु, कुलसचिवांची मंगळवारी सकाळी भेट घेतली. उस्मानाबाद उपकेंद्रातून विद्यापीठात बदली करण्याची मागणी त्यांनी कुलगुरुंकडे केली. या भेटीनंतर गुन्हे शाखेच्या पथकानेही विद्यापीठातील अधिकाऱ्यांची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. बदलीच्या मागणीवरूनही पोलीस चक्रावून गेले आहेत.

इतर खुनांची पुनरावृत्ती तर नाही?शहरात श्रुती भागवत, अमीना बी, हवाला प्रकारातून प्रकाशभाई पटेल यांची हत्या झाली होती. याशिवाय उद्योगपती पारस छाजेड यांच्यावर घरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही. या घटनांना वर्षे उलटून गेली आहेत. सबळ पुरावा हाती न लागल्यामुळे तसेच काही प्रकरणांमध्ये कुटुंबीयांच्या सदस्यांकडून बचाव व बनाव केला गेला आहे. त्यामुळे भूतकाळातील या खून आणि प्राणघातक हल्ल्यातील गुन्हेगारांचा अद्यापही पोलिसांना सुगावा लागू शकलेला नाही. डॉ. शिंदे यांच्या हत्येबाबतही असेच चित्र मंगळवारपर्यंत तरी पहायला मिळाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद