शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोणाची उधारी ठेवत नाहीत! मग हे काय, ६ लाख वीजग्राहक एक रुपयाही देईनात,१५९० कोटी थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 16:05 IST

महावितरणाला आता जाग, तीन वर्षांपासून ६ लाख वीजग्राहकांनी एक रुपयाही बिल भरले नाही, तब्बल १५९० कोटी रुपयांची थकबाकी

औरंगाबाद : आपल्या डोक्यावर कोणाची एक रुपयाचीही उधारी राहू नये, असे अनेकजण म्हणतात. मात्र, मराठवाड्यात तब्बल ६ लाख वीज ग्राहक आहेत की, त्यांनी गेल्या ३ वर्षांपासून एकही रुपया महावितरणकडे भरलेला नाही. त्यांच्याकडे तब्बल १५९० कोटी रुपये थकले आहेत. थकबाकीदार कोणीही असो, त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे सक्त आदेश आता महावितरणने संबंधित यंत्रणेला दिले.

वीजबिल वसुलीसाठी सर्व वर्गवारीतील ग्राहकांपर्यंत पोहोचून पाठपुरावा करण्यासाठी महावितरणने हर घर दस्तक उपक्रम, एक गाव एक दिवस उपक्रम, एक वाॅर्ड एक दिवस उपक्रमासह मार्च महिन्यात विविध उपक्रम राबवून जनजागृती केली. वसुलीसाठी ग्राहकांच्या घरोघरी बिल भरल्याची पडताळणी करून बिले भरून घेणे, सतत पाठपुरावा करणे, वीजबिल दुरुस्ती व बिले भरण्यासाठी मेळावे घेणे, प्रचार, प्रसिद्धी व विविध माध्यमातून जनजागृती करणे आदी उपक्रम राबविण्यात आले. तरीही मराठवाड्यात गेल्या ३ वर्षांपासून सर्व वर्गवारीतील ६ लाख ४७ हजार ६२२ वीज ग्राहकांनी एकही रुपया न भरल्याने १५९० कोटी ५५ लाख ३२ हजार रुपये थकविले आहेत.

...तर टळेल भारनियमनग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा केल्यास व संबंधित फिडरवर वीज चोरी कमी केल्यास फिडर भारनियमनाच्या वरच्या गटात येऊन भारनियमन टळेल. ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

मराठवाड्यातील थकबाकीची स्थितीपरिमंडळ - ग्राहक - थकबाकी (कोटी)औरंगाबाद - २,३२,७५४ - ५३४८३.७३लातूर - २,३३,०७३ - ५५२५६.४६नांदेड - १,८१,७९५ - ५०३१५.१४

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज