शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलांचे कारभारी आहेत तरी कोण ? दुरुस्तीसाठी यंत्रणांची टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 18:04 IST

एमएसआरडीसीचे पत्र, मनपाचे हात वर, पीडब्ल्यूडीकडे एक पूल

औरंगाबाद : शहरातील जालना रोडवरील पुलांची देखभाल-दुरुस्ती करण्यावरून, महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यात टोलवाटोलवी सुरू झाली आहे.

पुलांची देखभाल व दुरुस्ती कुणी करावी, यातून दोन्ही संस्थांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे त्या पुलांची दुरुस्ती कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाकडे शहरातील सेव्हन हिल पुलाचे हस्तांतरण करण्यात आले असून, पूल खराब झाल्याची ओरड सुरू झाल्यानंतरच ते जागे होतात. एमएसआरडीसी, मनपात पुलांच्या जबाबदारीवरून पत्रप्रपंचाच्या फैरी सुरू आहेत. बांधकाम विभागाकडे शहरातील फक्त एका पुलाची जबाबदारी आहे. ३ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुलांच्या जबाबदारीवरून मनपाने एका शब्दानेही उत्तर दिले नाही.

क्रांती चौक पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट सुरू‘लोकमत’ने ३ जानेवारीच्या अंकात क्रांती चौक उड्डाणपुलावर धोकादायक गॅप पडल्याचे वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर, ४ रोजी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, मंगळवारी बांधकाम विभागाने ऑडिट सुरू केले.

एमएसआरडीसी म्हणे वर्षापूर्वीच दिले पत्रएमएसआरडीसीने एक वर्षापूर्वीच मनपाला पत्र देऊन ४ पूल हस्तांतरित केल्याचे जाहीर केले. यात क्रांती चौक, मोंढा नाका, महावीर चौक, सिडको बस स्थानक या पुलांचा समावेश आहे. सेव्हन हिल्स पूल बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला. अभियंता साळुंके यांनी सांगितले, मनपाकडे पूल हस्तांतरित केले आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

मनपा म्हणते, पत्र देऊन कुठे हस्तांतरण होते का?मनपाचे शहर अभियंता एस.डी.पानझडे म्हणाले, रस्ते विकास महामंडळाने पूल बांधले आहेत. ते पत्राने हस्तांतरित कसे होतील? पुलाचे डिझाइन, मॅकेनिजम, बेअरिंग तंत्रज्ञान कसे आहे, इ. तांत्रिक बाबींची माहिती त्यांनी दिली पाहिजे. एमएसआरडीसीने सगळ्या बाबी मांडल्या पाहिजेत.

कंत्राटदाराकडे किती दिवस जबाबदारी?क्रांती चौक २०१७ पर्यंत, सेव्हन हिल्स २००७ पर्यंत, मोंढा नाका जून, २०२२, महावीर चौक मे, २०२३, सिडको उड्डाणपूल जून, २०२३ पर्यंत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका