शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांना कोण घरी बोलावतो? गडकरींनी नावे जाहीर करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 11:26 IST

विभागात जे कुणी लोकप्रतिनिधी कंत्राटदारांना घरी बोलावतात, त्यांची नावे गडकरींनी जाहीर करावीत, उगाच गव्हाबरोबर किडे रगडू नयेत, अशी पुष्टीही अनेकांनी जोडली.

ठळक मुद्देमराठवाड्यात कामासाठी आलेले कंत्राटदार अक्षरश: कामे सोडून पळून जात आहेत. वक्तव्याचे राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटू लागले आहेत. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील खासदार, आमदार केंद्र शासनाच्या एखाद्या मोठ्या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला घरी बोलावून आधी आमचे ‘काम’ कर असा आग्रह धरतात, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केल्यानंतर मराठवाड्यासह सर्व लोकप्रतिनिधींमध्ये अपमानाची भावना निर्माण झाली आहे. विभागात जे कुणी लोकप्रतिनिधी कंत्राटदारांना घरी बोलावतात, त्यांची नावे गडकरींनी जाहीर करावीत, उगाच गव्हाबरोबर किडे रगडू नयेत, अशी पुष्टीही अनेकांनी जोडली. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधील लोकप्रतिनिधींनी वेगवेगळी मते गडकरी यांच्या वक्तव्यावर व्यक्त केली असून, ज्यांनी कंत्राटदारांना घरी बोलावून काही मागण्या केल्या असतील त्यांची नावे जर गडकरींनी समोर आणली तर सत्य जनतेसमोर येईल. 

'मराठवाड्यात लोकप्रतिनिधी कंत्राटदाराला ‘घरी’ बोलवतात त्या त्रासामुळे काम सोडून पळतात'

केंद्र शासनाच्या निधीतून एखादा मोठा प्रकल्प मंजूर केला तर कंत्राटदाराला काम सुरू करण्यासाठी मराठवाड्यातील खासदार, आमदार त्याला घरी बोलावतात. अगोदर आमचे ‘काम’ कर, मगच पुढे विकासकामाला सुरुवात कर, असा अजब आग्रह धरतात. त्यामुळे मराठवाड्यात कामासाठी आलेले कंत्राटदार अक्षरश: कामे सोडून पळून जात आहेत. ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले होते. मराठवाड्यात कंत्राटदाराला त्रास देण्याची पद्धत अतिशय वाईट आहे. जे लोकप्रतिनिधी त्रास देतात त्यांना पकडा असेही सीबीआय संचालकांना सांगितल्याचे गडकरी म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटू लागले आहेत. 

नितीन गडकरी तुम्ही बोललात; पण हातचे राखून का बोललात?

लोकप्रतिनिधींची मते अशी-- सतीश चव्हाण, पदवीधर आमदार, राष्ट्रवादीमराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण म्हणाले, हा तर लोकप्रतिनिधींचा अपमानच आहे. जे कंत्राटदारांना घरी बोलावतात त्यांची नावे जाहीर करावीत. त्यांच्याबरोबर सर्वांना गृहीत धरू नये. गडकरी खरे बोलतात, त्यामुळे त्यांचे कौतुक वाटते. मात्र त्यांनी नावे समोर आणली तरी आनंद होईल. मग ते लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचे असोत. 

- अंबादास दानवे, विधानपरिषद आमदार, शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ.अंबादास दानवे म्हणाले, ज्यांनी हा सगळा प्रताप चालविला आहे, त्यांना उघडे करावे. गव्हाबरोबर किडे कशाला रगडता. आधी गडकरींनी मराठवाड्याला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. आम्हाला बाकीचे ज्ञान त्यांनी पाजळू नये. मराठवाड्याची उपेक्षा त्यांनी थांबवावी. 

- अतुल सावे, आमदार, भाजप भाजपचे आ.अतुल सावे म्हणाले, ज्यांनी अशी उठाठेव केली आहे, त्यांना त्या वक्तव्यामुळे त्रास झाला असेल. आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या वक्तव्यामुळे कुठलाही त्रास नाही. कारण आम्ही काही कंत्राटदार, अभियंत्यांना घरी बोलावून आमचे कोणतेही काम सांगत नाहीत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMarathwadaमराठवाडाfundsनिधीhighwayमहामार्ग