शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

'आम्हाला रोखणारे तुम्ही कोण'; नाकाबंदी दरम्यान तिघांची पोलिसाला जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 13:18 IST

Police Constable was beaten in Aurangabad : रात्री ११्.५० वाजेच्या सुमारास कॅनॉटकडून मुकुंदवाडीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी थांबण्यास सांगितले. 

ठळक मुद्देमध्यरात्री सिडकोतील लेमन ट्री हॉटेलसमाेर झाली घटनासिडको ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपींना अटक

औरंगाबाद:  आम्हाला रोखणारे तुम्ही कोण, असे म्हणत संचारबंदीचे उल्लंघन करून  फिरणार्या तीन तरूणांनी नाकाबंदी करणाऱ्या पोलिसाला बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना  ५ऑगस्ट रोजी मध्यरात्री ११.५० वाजेच्या सुमारास सिडकोतील वसंतराव नाईक चौकाजवळील हॉटेल लेमन ट्रीसमोर नाकाबंदी पॉईंटवर घडली. या घटनेप्रकरणी सिडको पोलिसांनी आरोपी तरूणांना अटक केली.

प्रताप पोपटराव जगताप(२४,रा. न्यू एस.टी. कॉलनी, एन २ सिडको),  आकाश सुनील कुलकर्णी(२३,रा. जयभवानीगनर) आणि आशुतोष नवनाथ झिंजुर्डे(२३,रा. जयभवानीनगर) अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. याघटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार गणेश आबाराव लोखंडे हे पोलीस काँन्स्टेबल असून ते दंगा काबू पथकात कार्यरत आहेत. गुरूवारी रात्री ते आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी भिसे,कडू, घोडके आणि पाराशर हे नाकाबंदी करीत होते. रात्री ११्.५० वाजेच्या सुमारास कॅनॉटकडून मुकुंदवाडीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला त्यांनी थांबण्यास सांगितले. तेव्हा तो काही अंतरावर जाऊन थांबला. लोखंडे हे त्याच्याजवळ जाऊन रात्री कशासाठी फिरत आहात असे त्यांनी त्याला विचारले असता दुचाकीस्वार तरूणाने त्यांना शिवीगाळ करीत तुम्ही मनपाचे कर्मचारी आहे,  तुला मला थांबविण्याचा काय अधिकार आहे ? असे म्हणून लोखंडे यांच्या शर्टच्या कॉलर पकडून त्यांना जोराचा धक्का मारला. यानंतर त्याने लोखंडे यांच्या गालावर जोरात बुक्का मारला. 

हा प्रकार पाहून लोखंडे यांचे सहकारी तेथे आले आणि मारहाण करणाऱ्या तरूणाला ते समजावून सांगू लागले. त्याचवेळी त्या तरूणाचे अन्य दोन साथीदार दुचाकीवरून तेथे आले. तुम्ही आमच्या मित्राला का थांबवले, असे म्हणून ते पो.कॉ. लोखंडे यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करीत पकडून खाली पाडले. तिघांपैकी एकाने रस्त्यावरील दगड उचलून लोखंडे यांच्या खांद्यावर मारला तर अन्य दोघांनी त्यांना लाथाबुक्याने मारहाण केली. यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक अशोक अवचार आणि कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांनी तात्काळ आरोपींना अटक केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस