शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

व्हाईट टॉपिंंगचे १५० कोटींचे ४४ रस्ते होणार डिफर्ड पेमेंटवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 00:55 IST

औरंगाबाद : शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी ३८ रस्त्यांचे व्हाईट टॉपिंगने काम करण्यात येणार आहे. १५० कोटींतून ४४ रस्ते तयार करण्यात येणार असून

औरंगाबाद : शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी ३८ रस्त्यांचे व्हाईट टॉपिंगने काम करण्यात येणार आहे. १५० कोटींतून ४४ रस्ते तयार करण्यात येणार असून, चार वर्षांपासून बंद केलेला डिफर्ड पेमेंटचा आतबट्ट्यांचा खेळ पालिका पुन्हा नव्याने करण्याच्या विचारात आहे.१५० कोटींच्या योजनेत पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर यात भर दिला जाणार आहे. निधीसंदर्भात राज्य शासनाकडे प्रशासनातर्फे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर होईपर्यंत डिफर्ड पेमेंट तत्त्वावर ही कामे सुरू केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहराच्या मध्यवर्ती भागातून खडकेश्वर मंदिर, बीबीका मकबरा, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय, सोनेरी महल, विद्यापीठ परिसराकडे जाता यावे यासाठी निराला बाजार ते खडकेश्वरपर्यंतच्या रस्त्याचे, औरंगपुऱ्यातील महात्मा फुले चौकापासून नेहरू भवन, सिटी क्लब तसेच औरंगपुरा भाजीमंडई ते सुराणा कॉम्प्लेक्समार्गे सिटीचौक आणि मकाईगेट ते बीबीका मकबरापर्यंतचा रस्ता व्हाईट टॉपिंग करण्यात येणार आहे. सातारा खंडोबा मंदिराकडे जाण्यासाठी एमआयटी कॉलेज ते खंडोबा मंदिराजवळील रस्ता पुलापर्यंत करण्यात येणार आहे.जटवाडा येथील जैन मंदिर, हर्सूल तलाव, स्मृतिवन व जळगावकडे जाणारा हडको एन-१२, अण्णाभाऊ साठे चौक ते हडको कॉर्नर ताज हॉटेलपर्यंतच्या ३० मीटर रस्त्याचे व्हाईट टॉपिंग करण्याचा प्रस्ताव आहे.