शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

३० हजाराची लाच घेताना गंगापुरच्या फौजदारासह खाजगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 19:33 IST

गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी घेतली लाच

औरंगाबाद: गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका जणाकडून खाजगी व्यक्तीमार्फत तीस हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यातील फौजदाराला लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. याविषयी गंगापुर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. 

फौजदार गजेंद्र तुळशीराम इंगळे  आणि खाजगी व्यक्ती समीर नासीर पठाण (वय २९,रा. मन्सुरी कॉलनी, गंगापुर)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.  याविषयी अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,  गंगापुर पोलीस ठाण्यात कार्यरत फौजदार इंगळे यांनी एका प्रकरणात चौकशीसाठी तक्रारदार यांना २८ जून रोजी  ठाण्यात बोलावले होते. तक्रारदार हे गंगापुर ठाण्यात गेले तेव्हा त्यांनी संबंधित प्रकरणात आरोपी न करण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांना ३० हजार रुपये लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी इंगळेविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार नोंदविली. 

या तक्रारीनुसार ३ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन सरकारी पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली.  तेव्हा फौजदार इंगळे यांनी तक्रारदार यांच्याकडे पुन्हा लाचेची रक्कम मागून ही रक्कम समीर पठाणकडे देण्याचे सांगितले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पठाणने लाचेची रक्कम घेण्याची तयारी दर्शविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या साध्या वेशातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याजवळील न्यू जनता हॉटेलसमोर सापळा रचला. फौजदार इंगळे यांनी सांगितल्यानुसार समीर हा तेथे आला आणि त्याने लाचेचे ३० हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून घेतले. समीरने लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला लाचेच्या रक्कमेसह पकडले. यानंतर लगेच गंगापुर ठाण्यातून फौजदार इंगळे यांनाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक  डॉ.श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बी.व्ही.गावडे, उपअधीक्षक सुजय घाटगे, कर्मचारी संदीप आव्हाळे, भिमराज जिवडे, अश्वलिंग होनराव, संतोष जोशी यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबाद