शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

कुठे फुकटच्या पाणीपुरीसाठी भोसकले, तर कुठे सोबत का राहत नाही विचारत जीवघेणा हल्ला

By राम शिनगारे | Updated: May 2, 2023 19:37 IST

किरकोळ वादातून घडले प्रकार. दोन ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : किरकोळ वादातुन कुठे चाकुने भोसकले, तर कुठे जिवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ला करणारे आणि झालेले दोन्ही ओळखीचे होते. या प्रकरणांमध्ये जिन्सी आणि उस्मानपुरा पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.

सोबत राहण्यासाठी चाकूने वार'तु मेरे साथ क्यु नही रहेता, ज्यादा मस्ती मे आया क्या, तु सोहेल बागवान के साथ क्यु रहेता है, तुझे और सोहेल को जान से मार दुंगा' असे म्हणून आमेर खान पाशु खान (रा. बायजीपुरा) याने फिर्यादी शेख अबुजर शेख अय्युब (रा. हर्सुल) यांच्या मानेवर, हातांवर आणि पाठीवर चाकूने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना २७ एप्रिल रोजी बायजीपुऱ्यात घडली. या प्रकरणी १ मे रोजी जिन्सी ठाण्यात आमेरच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

जमावाचा युवकावर हल्लातुझ्या मुलाला बोलावुन घे, त्याने चुकी केली आहे. त्याला माफी मागायला लावायची आहे, असे म्हणत दहा जणांच्या टोळक्याने एकावर जिवघेणा हल्ला केला. यात फिर्यादी आरेफ देशमुख (रा. कटकट गेट, बाबर कॉलनी) यांचा मुलगा अबरार हा गंभीर जखमी झाला. तर त्यांचा मेहुणा जावेद खान यासही चाकू लागला. याप्रकरणी आरेफ यांच्या तक्रारीवरून हुसेन खान उर्फ बब्बु, सैफ अब्बास खान, शहबाज हुसेन खान, हुसेन खानचा भाचा सोहेल, फैसल, फुरखान, नातेवाईक साद, रेहान, हारुण यांच्यासह हुसेनच्या जावायाच्या विरोधात जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदवला. ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता घडली.

फुकटच्या पाणीपुरीसाठी भोसकलेआम्हाला फुकट पाणीपुरी द्यायची तरच येथे गाडी लावायची असे म्हणत सय्यद शहजाद सय्यद अल्लु (रा.फुलेनगर, उस्मानपुरा), शेख अन्सार उर्फ इल्ली शेख सत्तार (रा.शहानुरवाडी) आणि शेख शाहरुख उर्फ जॉकी शेख वाहिद (रा. छोटा आशुर खाना, उस्मानुपरा) या तिघांनी पाणीपुरीवाल्यास शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. तेव्हा पाणीपुरीवाल्याचे काका पुरणसिंग यादव (रा. शहानुरवाडी) हे भांडण सोडविण्यास आले. तेव्हा तीन आरोपींनी त्यांना पकडून चाकूने भोसकले. ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता प्रतापनगर येथे घडली. या प्रकरणी उस्मानुपरा ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद