शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जेथे गुंडगिरी केली, तेथेच पोलिसांनी 'धिंड' काढली

By सुमित डोळे | Updated: July 22, 2023 22:30 IST

गारखेड्यातील ‘गँगवॉर’नंतर पुंडलिकनगर पोलिसांना अखेर जाग

छत्रपती संभाजीनगर : वर्चस्ववादातून रोज गुंडगिरी, टुकारपणा करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, तेथेच मित्र, कुटुंबासमोरून हातकड्यांसह गुन्हेगारांची धिंड काढण्यात आली. पाच दिवसांपूर्वी गुन्हेगारांच्या टोळ्याने एकमेकांवर शस्त्रांसह हल्ला केला. यातील सहा गुन्हेगारांना अटक केल्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांना इशारा देण्यासाठी शनिवारी दुपारी हे कडक पाऊल उचलले. इतर वेळी कॉलर वर करून फिरणाऱ्या मस्तवालांच्या माना यावेळी खाली गेल्या होत्या.

गारखेड्यातील मेहरसिंग नाईक महाविद्यालयासमोर १७ जुलै रोजी गुन्हेगार पुन्हा एकमेकांशी भिडले. एकेकाळी दुर्लभ कश्यपला आदर्श समजणारा गुन्हेगार राजू पठाडे यात गंभीर जखमी होऊन चॉपरच्या हल्ल्यात त्याच्या उजव्या गालाचे संपूर्ण मांस निघून डोळा निकामी झाला. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नितीन जाधवने हा प्रकार केला. जाधव घटनेनंतर पसार झाला. त्याच्या टोळीतील आकाश रतन वनपुरे (२७), प्रेम आसाराम सपाटे (३३), सूरज भगवान खंडागळे (३०), अमोल बळीराम वाघमारे (३२), शुभम भास्कर त्रिभुवन (२९) यांना तर राजूच्या टोळीतील तुषार संजय पाखरे याला अटक करण्यात आली. पुंडलिकनगरच्या पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी परिसरातील हे गुंडगिरीचे ‘भूत’ उतरवण्यासाठी गुन्हेगारांची धिंड काढण्याचे ठरवले. शनिवारी दुपारी दोन वाजता आरोपी राहत असलेला परिसर, हल्ला केलेल्या महाविद्यालय परिसरातून हातकडीसह फिरवले. गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरात अशा अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. जालना, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, बीड, परळी येथील स्वयंघोषित ‘दादां’ना ते आदर्श मानतात. ते गुंड देखील यांना आर्थिक रसद पुरवतात.

आता लक्ष्य टिप्याकुख्यात गुन्हेगार शेख मकसूद उर्फ टिप्या याने पुन्हा चाकू लावून एकाला लुटले. त्याच्यावर यापूर्वी देखील खून, खुनाचे प्रयत्न, अधिकाऱ्यांवर हल्ले, लूटमार, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच तो एमपीडीएतून बाहेर आला. मात्र, पुन्हा गुन्हे सुरू केले. अनेक हॉटेल, बारमध्ये दादागिरी केली. त्यामुळे टिप्यावर गंभीर कारवाई करून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या तयारीत पोलिस असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या अनुषंगाने पोलिसांनी तयारी सुरू केली असून त्याचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद