शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लोणकढी थापेचे घोडे कुठे अडले ? सिडकोच्या घरांचे फ्री होल्ड प्रकरण वर्षानुवर्षे थंड बस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 16:59 IST

फ्री होल्ड प्रकरणाची निवडणूक आली की होते चर्चा 

ठळक मुद्देसुमारे पन्नास हजार मालमत्ताधारकांचा हा प्रश्न आहे.सुविधा मागितल्यास मनपा व सिडको कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवते

- स.सो. खंडाळकर

औरंगाबाद : सिडको- हडकोच्या घरांच्या मालकीहक्काचा प्रश्न वर्षानुवर्षे थंड्या बस्त्यात पडून आहे. कुठलीही निवडणूक आली की हा प्रश्न ऐरणीवर येतो, चवीने चर्चिला जातो आणि निवडणूक संपली की, हा प्रश्न हवेत विरून जातो, असे मागील काही वर्षांपासूनचे चित्र आहे. 

जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सध्या कुठलीच निवडणूक नसतानाही अचानक या प्रश्नाची वाच्यता केली आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे जाहीर केले. सध्या जरी निवडणूक नसली तरी मनपाच्या संभाव्य निवडणुकीवर शिवसेनेचा नक्कीच डोळा असू शकतो. सिडको- हडको भागातील घरधारकांना मालकीहक्का अभावी अनेक प्रश्न भेडसावत आहेत. घराच्या बांधकामाची परवानगी मनपाकडून घ्या, ट्रान्स्फर चार्जेस सिडको कार्यालयात भरा, खरेदी-विक्रीच्या व्यवहारात रजिस्ट्री चार्जेस भरा, अशा दुष्टचक्रात सिडको- हडको भागातील नागरिक अडकून पडले आहेत. सुमारे पन्नास हजार मालमत्ताधारकांचा हा प्रश्न आहे. कृती समिती बनवून माजी नगरसेवक काशीनाथ कोकाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रश्न १९८८ पासून लावून धरला आहे; पण प्रश्न मार्गी लागण्याची सुतराम शक्यता दिसत नाही.वेळोवेळी शासन दरबारी अनेक राजकीय पक्ष, संघटना व व्यक्तींनी निवेदने दिली; परंतु त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. 

नागरिकांच्या संतप्त भावना‘तुमच्या लीज होल्ड रद्द’च्या घोषणेने दोन वर्षांपूर्वी  आम्ही फटाके फोडले; पण खरं सांगा तुमच्या लोणकढी थापेचे घोडे कुठे अडले,  असा सवालच सिडको- हडको भागातील नागरिक उपस्थित करीत आहेत. ‘पहिली पिढी वाट पाहून थकली, दुसऱ्या पिढीसाठी तरी घाई करा, पूर्ण हप्ते फिटले तरी लीज होल्डमुळे मालक आम्ही नाही, अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. सिडको- हडको भागातील पाणीपुरवठा महापालिकेकडे स्थलांतरित करून चौदा वर्षे झाली; पण पाणीपुरवठा नियमित होण्याऐवजी दिवसेंदिवस विस्कळीत होत आहे. सहा-सहा दिवसांनीही भरपूर व योग्य दाबाने पाणी मिळत नाही. नागरी सुविधा मागितल्यास मनपा व सिडको कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवत असतात. कम्प्लिशन चार्जेस, पेनल्टी भरा म्हणून सांगतात. या सगळ्या गोंधळात फ्री होल्डचा प्रश्न मात्र जिथल्या तिथेच आहे. 

टॅग्स :cidcoसिडकोAurangabadऔरंगाबादHomeसुंदर गृहनियोजन