शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कुठे जोरदार तर कुठे रिमझिम; मराठवाड्यातील सहा मंडळे दमदार पावसाने चिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 16:50 IST

विभागात ढगाळ वातावरण कायम 

औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना आणि नांदेड, लातूर जिल्ह्यांतील एकूण सहा मंडळे दमदार पावसाने चिंब झाली. बुधवारी सकाळपर्यंत विभागात ११.४५ मि. मी. पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील पाच, नांदेड व लातूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एका महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विभागात कुठे दमदार तर कुठे रिमझिम असा पाऊस सध्या सुरू असून, ढगाळ वातावरण दोन दिवसांपासून कायम आहे. 

जालना  शहर ८६ मि. मी., भोकरदन ७८ मि.मी., राजूर ८० मि.मी., अन्वा ७० मि.मी., जाफ्राबाद ८५ मि.मी. या महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. तसेच नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतील एकेका मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. औरंगाबादसह विभागात कमी-अधिक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरण्यांना गती दिली आहे. एकूण सरासरीच्या तुलनेत विभागात पावसाची मोठी कमतरता आहे. सर्व विभागात दमदार पावसाची हजेरी झाल्याची नोंद न झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अजून कायम आहे.

बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात ११.९४ मि.मी., जालना २२.५६ मि.मी., परभणी १२.०५ मि.मी., हिंगोली १७.०६ मि.मी., नांदेड  १४.५७ मि.मी., बीड ३.४४ मि.मी., लातूर ९.०४ मि.मी., तर उस्मानाबाद जिल्ह्यात ०.९५ मि.मी. पाऊस झाला. विभागात आजवर अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५५.८ टक्के  तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत फक्त ११.८ टक्के  पाऊस झाला आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मराठवाड्यातील बहुतांश मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, जालना व परभणी जिल्ह्यांतील काही मंडळात चांगला पाऊस झाला आहे. मात्र जलप्रकल्पांत अजून नोंद घेण्याइतके पाणी आलेले नाही.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादagricultureशेती