शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
2
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
3
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
4
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
5
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
6
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
7
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन
8
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
9
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
10
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
11
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
12
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
13
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?
14
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
15
बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी; तुळजापूर कनेक्शन?
16
प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक तरीही कमाई कमीच! 'केसरी २'चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर
17
Video - भलताच छंद! 'ती' डास मारते, जपून ठेवते अन् त्याला खास नाव देते; ठेवलाय अजब रेकॉर्ड
18
First ATM: केवळ ११,२०० लोकसंख्येचा असा देश, जिथे एकही ATM नव्हतं; आता सुरु झालं पहिलं एटीएम
19
तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई?
20
IPL- एक ‘डॉट बॉल’ पडला, की लागतील ५०० झाडे!

बनावट औषधींची निर्मिती कुठे, कच्चामाल कुठून मिळतो? गुन्हा दाखल, आता होणार तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:45 IST

राज्यभरातील विविध शहरांसह छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात कोल्हापूरच्या मे. विशाल एंटरप्रायजेसने बनावट औषधी पुरवठा केल्याचे डिसेंबर २०२४ मध्ये समोर आले होते.

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरासह छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात बनावट औषधींचा पुरवठा केल्याप्रकरणी अखेर ४ महिन्यांनंतर बुधवारी गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर औषधींची निर्मिती कुठे झाली आणि त्यासाठी लागणारा कच्चामाल, औषधींच्या पॅकिंगसाठी लागणारे पॅकिंग मटेरीयल कुठे मिळते, याचा तपास केला जाणार आहे.

राज्यभरातील विविध शहरांसह छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात कोल्हापूरच्या मे. विशाल एंटरप्रायजेसने बनावट औषधी पुरवठा केल्याचे डिसेंबर २०२४ मध्ये समोर आले होते. यानंतर घाटी रुग्णालय प्रशासनाने या औषधींचा वापर थांबविला. परंतु तोपर्यंत शेकडो गोळ्या रुग्णांच्या पोटात गेल्या होत्या. एका पुरवठादाराने दुसऱ्याला, दुसऱ्या पुरवठादाराने तिसऱ्याला आणि तिसऱ्या पुरवठादाराने ही औषधी घाटीला पुरवठा केल्याचे समोर आले. याप्रकरणी बुधवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी आता या औषधींची निर्मिती कुठे झाली, त्यासाठी लागणारा कच्चामाल आणि इतर साहित्य कुठून आले, याचा तपास केला जाणार आहे.

केरळला कंपनीच नसल्यावर शिक्कामोर्तबघाटी रुग्णालयाला पुरवठा झालेल्या बनावट औषधी केरळमधील कंपनीने निर्मिती केल्याचे नमूद केले होते. परंतु प्रत्यक्षात ही कंपनी अस्तित्वात नसल्याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने २७ डिसेंबर २०२४ रोजी प्रकाशित केले होते. अन्न व औषध प्रशासनाचे (औषधे) सहायक आयुक्त श्याम साळे म्हणाले, संबंधित कंपनीची पाहणी करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु केरळला ही कंपनी नसल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.

लॅबकडून चाचणीनंतर औषधी रुग्णांनाबनावट औषधी पुरवठ्याच्या प्रकारानंतर घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात आता खरेदी केलेल्या औषधींची आधी ‘एनएबीएल’ लॅबकडून तपासणी केली जात आहे. अहवाल आल्यानंतच ती रुग्णांना देण्यात येत आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmedicineऔषधं