शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

शेतकरी कर्जमाफी कधी होणार? परतफेडीचे आकडे काय सांगतात? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:35 IST

मतांवर डोळा ठेवून विधानसभा निवडणुकीत महायुतीने कर्जमाफी करणार असल्याची घोषणा केली होती.

छत्रपती संभाजीनगर : महायुतीने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याचा परिणाम परतफेडीवर प्रचंड झाला आहे. बँका परेशान झाल्या आहेत. त्यांना नवीन कर्जवाटप करणे अवघड झाले आहे.

मतांवर डोळा ठेवून विधानसभा निवडणुकीत महायुतीने कर्जमाफी करणार असल्याची घोषणा केली होती. त्याकडे शेतकरी लक्ष ठेवून आहेत. २०१७ ची कर्जमाफीची प्रोत्साहनपर योजनाही पूर्ण झालेली नाही. शेतकऱ्यांनो, आपल्या थकीत पीककर्जाचे नूतनीकरण ३१ मार्चअखेर पूर्ण करून घ्या, जेणेकरून पुढील हंगामासाठी पीककर्ज घेणे सुलभ होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतेच जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीच्या बैठकीत केले.

शेतकऱ्यांचे कर्ज किती थकले?१ लाख ८८ हजार शेतकऱ्यांचे १७२४ कोटी रुपयांचे पीककर्ज थकले आहे. जिल्ह्यात ४ लाख २० हजार शेतकऱ्यांना ३०३२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

वर्षभरापासून परतफेड लटकलीविधानसभा निवडणुकीपासून कर्ज परतफेड लटकली आहे. एकट्या महाराष्ट्र बँकेची ८४ टक्के परतफेड लटकली. हीच अवस्था स्टेट बँक व जि. म. सहकारी बँकेचीही झाली आहे. निवडणुकीपूर्वी थोडे तरी बरे होते. निवडणुकीनंतर कर्जमाफी होईल, या विश्वासावर परतफेड ठप्प आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा काहीच लाभ होत नाही. कर्जफेड न करणाऱ्यांना दोन-तीनदा लाभ मिळाला. सरकारने कर्जमाफीची घोषणा अमलात आणावी.- विठ्ठलराव काळे, ताजनापूर, ता. खुलताबाद.

निवडणुकीपूर्वी केलेली कर्जमाफीची घोषणा सरकारने पूर्ण करून दाखवावी. शेतकरी त्याची वाट पाहत आहेत.- पुंडलिकअप्पा अंभोरे, महाल पिंप्री, ता. छत्रपती संभाजीनगर

बँक अधिकारी पीककर्ज नूतनीकरण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे जातात, तेव्हा ते कर्जमाफी होणार असल्याचे सांगतात. त्यामुळे बँकांचे पीककर्ज थकीत प्रमाण भरपूर वाढले आहे. कर्ज घेतल्यापासून एक वर्षाच्या आत नूतनीकरण करून घेतले असता, रुपये ३ लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराचा फायदा होऊ शकतो. सोबतच कृषी पायाभूत सुविधा, अन्नप्रक्रिया उद्योग, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती इ. योजनांचा फायदा घेता येतो.- मंगेश केदार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, छत्रपती संभाजीनगर.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर