शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादला अखंडित वीज कधी मिळणार? दुरुस्ती-बिघाडाच्या नावाखाली अचानक होते गूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 12:54 IST

औद्योगिक, शैक्षणिक आणि वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाचे शहर दुर्लक्षित

- संतोष हिरेमठऔरंगाबाद :औरंगाबाद हे आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर असलेले ऐतिहासिक शहर आहे. मराठवाड्याचे मुख्यालय असताना औरंगाबादला अखंडित वीज का मिळत नाही? असा प्रश्न शहरवासीयांकडून विचारला जात आहे. शासनाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. परिणामी, २४ तासांत किमान एकदा तरी वीज ‘गूल’ होत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. त्यामुळे महावितरणच्या कारभाराला अक्षरश: नागरिक कंटाळले आहेत. 

वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्यासह वीज जाण्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळालीच पाहिजे. यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवा, असे आदेश तत्कालीन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नुकतेच दिले आहेत. परंतु औरंगाबादेत या आदेशाकडे दुर्लक्ष केलेच जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे अचानक वीज गूल होण्याचा 'शॉक' नागरिकांना दिला जात आहे.

शहरात अचानक वीजपुरवठा खंडित होणे, हे शहरात नित्याचेच झाले आहे. कधी दुरुस्तीच्या नावाखाली, तर कधी बिघाडाच्या नावाखाली वीज गूल होत आहे. त्यामुळे महावितरणच्या या अजब कारभाराने शहरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पावसाने हजेरी लावताच वीज जातेच, मात्र, पाऊस नसतानाही वीज का जातेय? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वसुलीवरच भरमहावितरणच्या शहर मंडळांतर्गत छावणी, पावर हाऊस , हर्सूल, शहागंज, सिडको, चिकलठाणा, गारखेडा, क्रांती चौक या उपविभागांमधील घरगुती ग्राहकांनी अनेक महिन्यांपासून वीज देयकाचा भरणा न केल्याने मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते. थकीत बिल असणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई हाती घेण्यात आली. थकीत वीजबिलाची वसुली करा, मात्र, अखंड वीजपुरवठा होण्यासाठी जुनाट यंत्रणा अद्ययावत करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

औरंगाबाद शहरातील वीजग्राहक- घरगुती- २,९७,२६३- व्यावसायिक-३५,०९३- औद्योगिक- ६,५२६- दिवाबत्ती-१,५२५- शेतीपंप-२,१३२- उच्चदाब-६४२- इतर २,२००- पाणीपुरवठा-४६- महिन्यांचे वीज बिलिंग-सुमारे १६८ कोटी रुपये.- ग्राहकांकडे ८८ कोटी रुपयांची थकबाकी.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणelectricityवीज