शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचं १६.६६ टीएमसी पाणी कधी देणार?

By बापू सोळुंके | Updated: March 28, 2023 11:35 IST

आमचा हक्क, आमचं पाणी :कृष्णा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्रानुसार मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढणे अपेक्षित होते.

छत्रपती संभाजीनगर : कृष्णा खोऱ्यांतर्गत मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेले २३.६६ टीएमसी पैकी केवळ ७ टीएमसी पाणी दिले जाते. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी कधी देणार, असा सवाल उपस्थित होत आहे. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी तातडीने शासनाने देण्याचा निर्णय घ्यावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनावर दबाव टाकणे गरजेचे आहे.

कमी पर्जन्यमान असलेल्या मराठवाड्यातील ७६ टक्के क्षेत्र गोदावरी खोऱ्यात तर २४ टक्के कृष्णा खोऱ्यात येते. जस्टीस बच्छावत लवादानुसार कृष्णा खोऱ्याचा महाराष्ट्रात २८ टक्के, कर्नाटकमध्ये ४६ टक्के तर तेलंगणा राज्यात २६ टक्के हिस्सा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा तर मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड जिल्ह्यांचा यात समावेश आहे. कृष्णा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्रानुसार मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढणे अपेक्षित होते. मात्र, जलसंपदाच्या आकडेवारीचा विचार करता कृष्णा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्रात सिंचनाची सरासरी टक्केवारी ४२.४५ टक्के आहे. तर धाराशिव जिल्ह्यात १९.३६ टक्के तर बीड जिल्ह्यात १७.६९ टक्के एवढेच आहे. कृष्णा खोऱ्यात मराठवाड्यातील या दोन्ही जिल्ह्यांचा वाटा ४८.५ टीएमसी आहे.

आतापर्यंत प्रत्यक्षात २५.४ टीएमसी पाणी मिळाले आहे. उर्वरित २३.१ टीएमसी पाणी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २२ फेब्रुवारी २००५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृष्णा खोऱ्याचे २३.६६ टीएमसी पाणी मंजूर केले होते. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करता तत्कालीन राज्य सरकारने २००७ साली कृष्णा खोऱ्यात मराठवाड्यासाठी १९ टीएमसी पाणीच उपलब्ध असल्याचे नमूद केले. मात्र, या निर्णयाचा मराठवाड्यातील नेत्यांनी विरोध केल्यानंतर जलसंपदा विभागाने सुधारित आराखडा तयार केला, यानंतर २७ ऑगस्ट २००९ रोजी २३.६६ टीएमसी पाण्याला मंजुरी दिली. मात्र, हे पाणी मंजूर करताना मराठवाड्याला ७ टीएमसीपर्यंतच पाणी देण्याबाबत निर्बंध घातले. परिणामी, १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही मराठवाडावासीयांना कृष्णा खाेऱ्याकडून हक्काचे आणखी १६.६६ टीएमसी पाण्याची प्रतीक्षा आहे.

शासनाने तत्काळ निर्णय घेणे गरजेचे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील कृष्णा खोऱ्यामध्ये असलेल्या धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील सिंचन क्षमता पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याएवढी करण्याची जबाबदारी शासनाची आहे. सिंचनाची तूट भरून काढण्यासाठी २२ फेब्रुवारी २००५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठकीत दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कृष्णा खोऱ्यातील २३.६६ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने तत्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे. शासनाने हा निर्णय घ्यावा, यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी शासनास हा निर्णय घेण्यास भाग पाडावे.-डॉ. शंकरराव नागरे, जलतज्ज्ञ तथा सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाWaterपाणी