शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

समांतर योजनेच्या पॅकअपनंतर शहराच्या पाणीपुरवठ्याचे काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 19:59 IST

शहराच्या पाणीपुरवठ्याचे काय होणार, अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीमुळे नवीन योजना जाहीर करण्यास वेळ मिळणे कठीण शहराला २५० एमएलडीपेक्षा अधिक पाणी हवे असताना १५० एमएलडी पाणीपुरवठा होतो

औरंगाबाद : शहराला २५० एमएलडीपेक्षा अधिक पाणी हवे असताना जेमतेम १५० एमएलडी पाणीपुरवठा होतो आहे, अशा बिकट स्थितीत शहरात ९ वर्षांपासून चर्चेत असलेली समांतर पाणीपुरवठा योजना गुंडाळण्यात आली. शासनाकडे नवीन योजनेचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. मात्र, आगामी निवडणुकीमुळे किमान सहा महिने तरी राज्य शासनाला नवीन योजना जाहीर करायला वेळ नाही. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे काय होणार, अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.

औरंगाबाद शहराचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता महापालिके कडून होणारा पाणीपुरवठा आजघडीला अपुरा पडत आहे. शहराला वाढीव पाणी मिळण्यासाठी समांतर योजनेकडे नागरिकांचे डोळे लागले होते.  त्यादृष्टीने समांतर योजनेची मार्च २०११ मध्ये निविदा मंजूर झाली होती. मात्र, अनेक गोंधळ, वादात एक-एक वर्ष उलटून गेली. गेल्या ९ वर्षांत पाणी तर मिळालेच नाही. शासनाकडे नव्याने योजना मागण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेने समांतरच्या कंपनीसोबत केलेले तडजोडीचे सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरले आहे. समांतरच्या कंपनीनेदेखील अटी मान्य होणार नसतील, तर आम्ही काम करणार नाही, असे लेखी कळविले. त्यानंतर मनपाने सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील समांतर योजनेला गुंडाळण्यावर १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब झाले. समांतर जलवाहिनीसाठी कें द्र्र शासनाने २०११ मध्ये १४२ कोटी रुपये दिले आहेत. राज्य शासनाने १८ कोटी रुपये दिले आहेत. यावर सुमारे १४० कोटी रुपयांचे व्याज जमा होत आले आहे. मनपाकडून शासनाकडे नव्या योजनेसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे; परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच आचारसंहिताही लागणार आहे. त्यामुळे नजीकच्या कालावधीत तरी प्रस्तावाला मंजुरी मिळणे अशक्य दिसते. निवडणुकीच्या व्यापात राज्य शासनाला शहरासाठी नवीन योजना जाहीर करण्यासाठी फुरसत नाही. प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळाली तरी प्रत्यक्ष काम होऊन शहरात वाढीव पाणी येण्यासाठी किती वर्षे लागतील, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे औरंगाबादकरांना किमान तीन वर्षे तरी सध्या मिळणाऱ्या पाण्यातच भागवावे लागणार असल्याचे दिसते.उन्हाळ्यात पाण्यासाठी चटकेइतक्या वर्षात समांतर योजना पूर्ण करून शहरात मुबलक पाणी देणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. त्यामुळे औरंगाबादकरांना उन्हाळा सुरू होताच पाण्याचे चटके बसू लागतात. यंदाही हीच परिस्थिती राहणार आहे. कारण शहरातील पाणीपुरवठा आताच विस्कळीत झालेला आहे. काही वॉर्डांमध्ये चार दिवसाआड तर काही वॉर्डांत पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. एन-५, एन-७ येथील पाण्याच्या टाक्या उशिरा भरल्या जातात. त्यामुळे नागरिकांकडून ओरड होत आहे.  त्यामुळे उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांचे आणखी हाल होणार आहेत. समांतर योजना पूर्ण होऊ शकली नाही, हेच यासाठी कारणीभूत ठरले आहे.दररोज पाणी स्वप्नवतगेल्या अनेक वर्षांपासून समांतर योजनेच्या नावाखाली शहरवासीयांना दररोज पाणी देण्याची स्वप्नेच दाखविण्यात आली. निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही मुबलक पाणीपुरवठ्याचा मुद्दा वापरण्यात आला. प्रत्यक्षात नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहराजवळ जायकवाडी धरण असूनही शहरापर्यंत पाणी पोहोचविण्याची नवीन व्यवस्था महापालिका उभी करू शकत नाही.............

टॅग्स :Parallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका