शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बिल वेळेत भरूनही लाइट जात असेल तर काय करायचे साहेब?

By साहेबराव हिवराळे | Updated: September 8, 2023 19:00 IST

मागणीएवढी वीज उपलब्ध करण्यासाठी महावितरण कसोशीने प्रयत्न करीत आहे.

छत्रपती संभाजीनगर : पावसाने पाठ फिरवल्याने विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे भारनियमन वाढले आहे. पावसाने ओढ दिल्याने राज्यात वाढलेल्या विजेच्या मागणीचा व उपलब्धतेचा समतोल राखण्यासाठी महावितरणला काही ठिकाणी नाइलाजास्तव आकस्मिक भारनियमन करावे लागत आहे. मात्र हे भारनियमन तात्पुरते आहे.

मागणीएवढी वीज उपलब्ध करण्यासाठी महावितरण कसोशीने प्रयत्न करीत आहे. दोन दिवसांपासून पाऊस पडल्याने दिवसभर भारनियमन झालेले नाही. ही परिस्थिती अशीच राहावी, अशी इच्छा विनाकारण उकाडा सहन करणाऱ्यांतून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात विजेची मागणी किती?राज्यात शुक्रवारी सकाळी विजेची शिखर मागणी २४ हजार ३०० मेगावॅट होती. जवळपास ८०० ते ९०० मेगावॅटचे सकाळी ६ ते ७.३० या काळात चक्राकार पद्धतीने जी १, जी २ व जी ३ या गटात भारनियमन करण्यात आले.

उपलब्ध वीज किती?४ हजार ३०० मेगावॅट होती. त्यात ९०० मेगावॅटचे चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागत आहे. पाऊस नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे बोलले जात आहे.

शहरात एक तास, ग्रामीण भागात चार तासांपर्यंत भारनियमनघरगुती, वाणिज्यिक, कृषी, औद्योगिक व इतर सर्व वीज ग्राहकांनी विशेषतः सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत व सायंकाळी ६ ते रात्री १० या कमाल मागणीच्या कालावधीत विजेचे भारनियमन तर शहरात सकाळी ६ ते ७.३० या काळात चक्राकार पद्धतीने जी १, जी २ व जी ३ या गटात भारनियमन करण्यात आले.

वीजगळती जास्त, तिथे भारनियमन जास्तभारनियमनाचीही वर्गवारी केली असून, सी कॅटेगिरीतील नागरिकांना अधिक फटका बसत आहे.

बिल भरूनही त्रास का?नियमित वीज बिल अदा करणाऱ्यांना भारनियमनाने त्रस्त करणे योग्य नाही. आम्ही आंदोलन छेडणार आहोत.- महेंद्र साळवे

डेंग्यूची लागण झाल्यास...?बिल अदा करूनही उपकरणे बंद असल्याने डेंग्यूची लागण झाल्यास त्यास जबाबदार कोण?- हरिभाऊ राठोड

शनिवारी पाऊस पडल्याने रविवारी वीज सुरळीतपावसाने ओढ दिल्याने विजेची मागणी वाढली. ती पूर्ण करण्यासाठी वरूनच हा निर्णय होता; परंतु शनिवारच्या पावसामुळे रविवारी सुरळीत वीजपुरवठा होता.- महावितरण अभियंता

टॅग्स :AurangabadऔरंगाबादelectricityवीजRainपाऊस