शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

हे काय? ४० वर्षांपासून शासकीय दंत रुग्णालयात औषधींना ठेंगा!

By संतोष हिरेमठ | Updated: May 12, 2023 13:23 IST

रुग्णालयात औषधालयच गायब, औषधी-गोळ्या मिळतच नाहीच, मेडिकल गाठण्याचीच वेळ, रुग्णांच्या खिशालाच कात्री

छत्रपती संभाजीनगर : सरकारी रुग्णालय म्हटले की, तपासणीबरोबर काही प्रमाणात का होईना, रुग्णांना औषधी मिळतात. परंतु शहरातील एक शासकीय रुग्णालय असे आहे की, जेथे गेल्या ४० वर्षांपासून रुग्णांना औषधीच मिळत नाही. कारण या ठिकाणी औषधालयच नाही आणि शासनाकडूनही औषधी-गोळ्यांचा पुरवठा होत नाही. हे रुग्णालय म्हणजे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय. दातांचे उपचार घेताना औषधी लागली तर ती रुग्णांना मेडिकलवरूनच खरेदी करावी लागत असल्याची परिस्थिती आहे.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात दंतोपचारासाठी दररोज संपूर्ण मराठवाड्यासह लगतच्या भागातून रुग्ण दाखल होतात. खाजगी रुग्णालयांत दातांचे उपचार घेणे गोरगरीब आणि सर्वसमान्यांना परवडत नाही. त्यामुळेच शासकीय दंत महाविद्यालय सर्वसामान्यांच्या मुखआरोग्यासाठी आधारवड ठरत आहे. वैद्यकीय तपासण्यांपासून तर उपचार या ठिकाणी मिळतात. परंतु औषधी मात्र बाहेरून घेण्याची वेळ रुग्णांवर ओढावत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यासाठी रुग्णांना मेडिकलचा रस्ता दाखविला जात आहे.

रोज किती रुग्ण?शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात ९ विभागांच्या माध्यमातून विविध दंतोपचार होतात. एका विभागात दररोज ५० ते ६० रुग्णांवर उपचार होतात. त्यानुसार दररोज ४०० ते ५०० रुग्ण उपचार घेतात.

कोणती औषधी लागतात?दात काढणे, रूट कॅनाॅल, सर्जरीच्या रुग्णांना प्रामुख्याने पेनकिलर, अँटिबोयोटिक द्यावी लागतात. आजघडीला ही औषधी रुग्णांना स्वत:चा खिसा रिकामा करत बाहेर खासगी मेडिकलमधूनच घ्यावी लागत आहेत.

किती बसतो भुर्दंड?पेनकिलर, अँटिबोयोटिकसाठी रुग्णांना अगदी १०० रुपयांपासून तर ५०० रुपयांपर्यंत मोजावे लागतात. ही औषधी लागणाऱ्या ‘डेंटल’च्या रुग्णांनी घाटीतील बाह्यरुग्ण विभागात मेडिसीन विभागात गेले पाहिजे, असे शासकीय दंत महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून सांगितले जाते.

‘डेंटल’ मेटेरियलसाठीच निधीदंतोपाचारासाठी लागणाऱ्या साहित्यांचा (डेंटल मेटेरियल) पुरवठा होतो. परंतु औषधी-गोळ्यांचा पुरवठा होत नाही. राज्यभरातील शासकीय दंत महाविद्यालयात हीच स्थिती आहे. रुग्णालयात औषधालय गरजेचे आहे. परंतु त्यासाठी फार्मासिस्ट, सहायक, चतुर्थश्रेणी कर्मचारी लागतील. औषधींही पुरवठा झाला पाहिजे, असे डाॅक्टरांनी म्हटले.

काय म्हणाले अधिष्ठाता?शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. एस. पी. डांगे म्हणाले, रुग्णालयाला डेंटल मटेरियल पुरवठा होतो. औषधी-गोळ्या मिळत नाही. दोनच विभागातील रुग्णांना पेनकिलर आणि अँटिबायोटिक द्यावी लागतात. ती घाटी रुग्णालयातून घेता येतात. डाॅक्टरांनी कुणालाही बाहेरून औषधी घेण्यासाठी लिहून देता कामा नये. ‘एचएमआयएस’ प्रणाली सुरू झाल्यानंतर आमच्याकडील रुग्णांना थेट घाटीतून औषधी घेता येईल, असे नियोजन होऊ शकते.

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबाद