शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत मुलांसाठी कोवळे ऊन महत्त्वाचे कशासाठी? जाणून घ्या फायदे

By राम शिनगारे | Updated: January 18, 2024 19:26 IST

सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेतल्याने शरीराला भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व डी प्राप्त होते.

छत्रपती संभाजीनगर : सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. कोवळ्या उन्हात बसल्यामुळे शरीराला ‘व्हिटॅमिन डी’ मिळते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्यातच शरीरात आयर्न कमी असेल तर ते भरून निघण्यास मदत होते. त्वचेचा संसर्ग, थकवा, अशक्तपणासह इतर आजारांना कमी आयर्नमुळे सामोरे जावे लागते. कोवळ्या उन्हात बसल्यामुळे हे आजार कमी होण्यास मदत होते. त्यामुळे थंडीच्या दिवसात मुलांना कोवळे ऊन फायदेशीर ठरते.

कोवळ्या उन्हातून मुलांना काय मिळते?सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेतल्याने शरीराला भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व डी प्राप्त होते. शरीर उबदार राहते. पुरेशी आणि आरामदायी झोप लागते. लहान मुलांमध्ये कावीळ होण्याची शक्यता कमी असते. यासह अनेक आरोग्यदायी फायदे मुलांना मिळतात.

जि. प. शाळांचा पहिला तास व्हरांड्यातच व्हायचाकाही वर्षांपूर्वी खूप थंडी पडलेली असेल तर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये प्रार्थना झाल्यानंतर पहिला तास व्हरांड्यातच होत असे. त्यामुळे मुलांना कोवळ्या उन्हासह थंडीपासून बचाव होण्यास मदत होत होती.

आता सर्व तास बंद खोलीतखासगी माध्यमांच्या शाळांमध्ये आता वर्गखोल्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे आता सर्व तास बंद खोल्यांमध्येच घेतले जातात. त्यामुळे मुलांना थंडीत उन्हापासून बचाव करण्याची संधीच मिळत नसल्याचेही दिसून येते.

दुपारी तीन वाजेनंतरचे ऊन द्यायला पाहिजेव्यक्तीची त्वचा म्हणजे ‘व्हिटॅमिन डी’ तयार करणारी फॅक्टरी आहे. सूर्यकिरणे हा त्यांचा कच्चा माल आहे. सकाळची सूर्यकिरणे ही तिरपी पडतात. त्यामुळे ‘व्हिटॅमिन डी’चे प्रमाण कमी होते. त्यामुळे थंडीमध्ये लहान मुलांना दुपारी तीन वाजेनंतरचे ऊन द्यायला पाहिजे. तेव्हा किरणे ९० अंशांच्या कोनात पडलेली असतात. या उन्हामुळे शरीरातील हाडे बळकट होतात. हृदय व किडनीचे कार्य नॉर्मल ठेवण्यास मदत होत असते.-डॉ. यशवंत गाडे, अस्थिरोगतज्ज्ञ 

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद