शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादला झाले तरी काय? सिडकोत गोळीबार, चिकलठाण्यातही रिव्हॉल्व्हरची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 11:46 IST

अल्पवयीनसह पाच जणांना अटक : एकाला जामीन, तिघांची हर्सूल कारागृहात रवानगी

औरंगाबाद : सिडको उड्डाणपुलाजवळील रामगिरी हॉटेलच्या खाली शनिवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पाच जणांमध्ये आपसात तुफान हाणामारी सुरू होती. त्यातील एकाजवळ असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून एक गोळी झाडली. या घटनेपूर्वी चार जणांनी चिकलठाण्यातील एका टपरीवर उभ्या असलेल्या युवकांना रिव्हॉल्व्हर दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रकार समोर आला आहे.

सिडको पोलिसांनी नीलेश सुदाम देहाडे, निखिल विजयानंद आगलावे (दोघे रा. ठाकरेनगर, विनय कॉलनी, सिडको), शिवराज दत्तात्रय संबळे, योगेश नागोराव हेकाडे (दोघे रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) यांच्यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. या पाच जणांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. नीलेशजवळ असलेले रिव्हॉल्व्हर त्याने शिवराजवर रोखून धरले होते. त्यापूर्वी त्याने एक गोळीही झाडल्याचे उपस्थितांनी सांगितले. मात्र पोलिसांच्या चौकशीत आराेपींनी तशी कबुली दिलेली नाही. न्यायालयाने शिवराज संबळे यास जामीन मंजूर केला तर तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत. दरम्यान, सिडको पोलीस ठाण्यात ड्युटी इन्चार्ज असलेले उपनिरीक्षक बुधा शिंदे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी अरेरावी केल्याचा प्रकारही मध्यरात्री घडला.

चिकलठाण्यातही गोळीबार का?चिकलठाणा भागातील द्वारकेश मार्केटसमोरील एका टपरीवर काळे शर्ट घातलेले चार युवक दुचाकीवर आले. त्यातील एका जणाच्या हातात रिव्हॉल्व्हर होते. त्याने ते तेथील उपस्थित युवकांवर रोखून धरले. त्यामुळे एकच घबराट निर्माण झाली. त्या युवकाने गोळी झाडल्याचा दावा उपस्थितांनी केला आहे. त्या ठिकाणी दहशत निर्माण केल्यानंतर ते युवक मिनी घाटीजवळ थांबले. त्यांचा पाठलाग करीत टपरीवरील युवक मिनी घाटीजवळ येताच तेथून त्यांनी सिडकोच्या दिशेने धूम ठोकल्याची माहिती उपस्थितांनी दिली. त्यामुळे चिकलठाण्यातही गोळीबार झाला का, असा प्रश्न आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी