शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मनुस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध? विनाकारण टीका करणे थांबवा: मेधा कुलकर्णी

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 1, 2024 11:33 IST

महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली. हत्या करणारा एक ब्राह्मण होता, यात सर्व समाजाचा काय दोष?

छत्रपती संभाजीनगर : मनुस्मृती फाडली जाते, जाळली जाते. असे केल्याने काय फरक पडणार आहे? मनृस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध? मनुस्मृती ज्यावेळी लिहिण्यात आली, तेव्हा एकट्या ब्राह्मणानेच लिहिली नाही. जे जे मनू होऊन गेले, ते सर्व ब्राह्मणच होते, यावर विश्वास असण्याचे कारण नाही. त्यातील जे चांगले आहे ते घ्या, जे वाईट आहे त्यावर सर्व मिळून टीका करू, अशी रोखठोक भूमिका खा. मेधा कुलकर्णी यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगरात आयोजित ब्राह्मण अधिवेशनात मांडली. आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ऊठसूट विनाकारण ब्राह्मणांवर टीका करणे आता थांबवा, असा इशाराही त्यांनी दिला.

अ. भा. पेशवा संघटनेच्या तापडिया नाट्यमंदिरात आयोजित या अधिवेशनाला राज्यभरातून ब्रह्मवृंद दाखल झाला होता. खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल मेधा कुलकर्णी यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. समाजाची आजची परिस्थिती व राजकीय स्वार्थापायी राजकारणाकडून सतत समाजावर होणारी टीका, यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिले.

महात्मा गांधींची हत्या केली एकाने, समाज दोषी कसा?महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली. हत्या करणारा एक ब्राह्मण होता, यात सर्व समाजाचा काय दोष? मात्र, संपूर्ण ब्राह्मणांवर त्याचा राग काढण्यात आला, समाजाला वाळीत टाकण्यात आले. अजूनही विरोधी राजकारणी समाजा-समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी त्या घटनेवरून ब्राह्मण समाजावर टीका करतात. हे किती दिवस सहन करायचे? हे थांबले पाहिजे, असेही खा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

शेंडी, जाणव्यावर टिंगल करणाऱ्यांची वृत्तीआम्ही शेंडी, जाणव्याचे हिंदुत्व मानत नाही, असे लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या नावाचा उल्लेख न करता खा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, शेंडी, जाणव्याचे असे कोणते वेगळे हिंदुत्व नाही आहे. हिंदू धर्मात असे अनेक समाज, पंथ आहेत ज्यात संस्कार, विधी म्हणून शेंडी ठेवली जाते व जाणवे घातले जाते. एकटा ब्राह्मण समाजच नाही. समाजा-समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या अशा राजकारणी मनोवृत्तीला कायमचे मिटवा, असे आवाहनही त्यांनी केले.

सर्व समाजांनी एकत्र यावेहिंदू म्हणजे एकटा ब्राह्मण नव्हे. यात सर्व जातीपंथांचा समावेश होतो. आपण सर्वजण आधी हिंदू व नंतर ब्राह्मण, मराठा व विविध जातीपंथातील आहोत. यामुळे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मेधा कुलकर्णी यांनी केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmedha kulkarniमेधा कुलकर्णीBJPभाजपा