शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता ! एका उंदराने शहराचा पाणीपुरवठा २४ तास बंद केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 13:56 IST

गुरुवारी पहाटे जायकवाडी धरणातील मुख्य पंपगृहात जलवाहिनीच्या पंपांना वीजपुरवठा करणार्‍या पॅनल बोर्डमध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला.

ठळक मुद्देपॅनल बोर्डमध्ये एका उंदराने केबल कुरतडली होती.उंदराला नंतर शोक लागल्यामुळे पॅनल बोर्डमधील केबल शॉर्टसर्किटने जळाली.

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी पाण्याचा उपसा करणार्‍या विद्युत मोटारीजवळील पॅनल बोर्डमध्ये एका उंदराने गुरुवारी पहाटे केबल कुरतडली. त्यानंतर शॉक लागून उंदीरही मेला. शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण केबल जळाली. महापालिकेच्या यांत्रिकी विभागाला केबल बदलणे आणि इतर दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल चोवीस तास लागले. शुक्रवारी सकाळी शहरात पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला.

गुरुवारी पहाटे जायकवाडी धरणातील मुख्य पंपगृहात जलवाहिनीच्या पंपांना वीजपुरवठा करणार्‍या पॅनल बोर्डमध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहानिशा केली असता, एका उंदराने केबल कुरतडली होती. उंदराला नंतर शोक लागल्यामुळे पॅनल बोर्डमधील केबल शॉर्टसर्किटने जळाली. या भागातील ट्रान्सफाॅर्मर सुद्धा खराब झाला होता. उपअभियंता बी. डी. घुले यांनी पर्यायी ट्रान्सफार्मर बसवून त्याची चाचणी करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी चार वाजता पंपिंग सुरू करून पाणी उपसा सुरू झाला. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी दाखल झाल्यानंतर त्यावर प्रक्रिया होऊन रात्री साडेनऊ वाजता शहरातील जलकुंभांत पाणी पडले. यानंतर शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत जलकुंभ भरल्यानंतर मागील बुधवारी व गुरुवारी सिडको-हडकोसह ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होऊ शकला नाही, तेथे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शुक्रवारी दिवसभरात बहुतांश वसाहतींना पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली.

शहरात तीव्र पाणीटंचाईबुधवारी, गुरुवारी ज्या वसाहतींमध्ये पाणी आले नाही, तेथील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना शुक्रवारी एकसारखे फोन करून, आज आमच्या वसाहतीत पाणी येणार की नाही, अशी विचारणा केली. तसेच काही नागरिकांनी आपल्या भागातील लोकप्रतिनिधींना पाण्यासाठी भंडावून सोडले. दरम्यान, मध्य मतदारसंघाचे आ. प्रदीप जैस्वाल यांनीही कार्यकारी अभियंता धांडे यांना फोन करून पाण्याविषयी विचारणा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका