शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? २९६ रुपयांत घरीच गर्भपात; एमटीपी किटची ऑनलाईन विक्री उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 14:14 IST

औषधी विक्रेत्याने उघड केला प्रकार, नशेखाेरीसाठीही ऑनलाईन औषधी विक्री

औरंगाबाद : गर्भपातासाठी वापरण्यात येणारी एमटीपी किटची ऑनलाईन ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या ३ दिवसांत ही किट घरपोच मिळते, तेही अवघ्या २९६ रुपयांमध्ये. हा धक्कादायक प्रकार शहरातील एका औषधी विक्रेत्याने उघड केला आहे. नशेखाेरीसाठीही अशा प्रकारे ऑनलाईन औषधी विक्री होत असल्याचा दावा औषधी विक्रेत्याने केला आहे.

निखिल मित्तल असे या औषधी विक्रेत्याचे नाव आहे. डाॅक्टरांची चिठ्ठी असेल तरच औषध विक्रेत्यांनी झोपेच्या गोळ्या विकणे बंधनकारक आहे; मात्र डाॅक्टरांच्या चिठ्ठी शिवाय नशेसाठी झोपेच्या गोळ्यांचा ‘डोस’ देण्याचा उद्योग सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले. यासंदर्भात ‘लोकमत’ने २४ मार्च रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. ऑनलाईनवर डाॅक्टरांच्या चिठ्ठी शिवाय औषधी मिळतात, हे प्रशासनासमोर आणण्यासाठी निखिल मित्तल यांनी ३ दिवसांपूर्वी एमटीपी किट ऑनलाईन ऑर्डर दिली होती. डाॅक्टरांच्या चिठ्ठी शिवाय त्यांना ५ गोळ्यांची एमटीपी किट सोमवारी प्राप्त झाली.

ऑनलाईन विक्री रोखावीऔषधी विक्रेते हे डाॅक्टरांच्या चिठ्ठी शिवाय औषधी देत नाहीत. काही जण देत असतील; पण त्यामुळे सर्वच चुकीचे करतात, असे नाही. नशेसाठी, गर्भपाताची औषधी ऑनलाईनवर डाॅक्टरांच्या चिठ्ठी शिवाय सहज मिळतात. हे सिद्ध करण्यासाठीच ऑनलाईन एमटीपी किट मागविली. अवघ्या तीन दिवसांत ती मिळाली. याप्रकरणी आता प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. ऑनलाईन औषधी विक्री रोखणे गरजेचे आहे.- निखिल मित्तल, औषध विक्रेता

डाॅक्टरांचा सल्ला, देखरेख गरजेचीगर्भपाताच्या गोळ्या डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि देखरेखीशिवाय घेता कामा नये. कायद्यानुसार ९ आठवडे अथवा ६३ दिवसांपर्यंत या गोळ्या देता येतात. स्वत:हून या गोळ्या घेतल्यास अतिरक्तस्त्राव, अर्धवट गर्भपाताची भीती नाकारता येत नाही. रुग्ण शाॅकमध्येही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक जण या गोळ्या घेतल्यानंतर गंभीर अवस्थेत रुग्णालयात येतात.- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी

कारवाई केली जाईलऔषधी विक्रेत्याने एमटीपी किटसंदर्भात माहिती दिली आहे. त्यांच्याकडून औषधी, बिल आणि ऑर्डर्सची माहिती मागवली आहे. ती प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल.-शाम साळे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (औषधे)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी