शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

आढावा बैठकीतून आमदार बंब यांना काय साधायचे आहे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 14:06 IST

आमदारांना अशा प्रकारच्या आढावा बैठका घेता येतात का? पदाधिका-यांच्या अपरोक्ष बैठक घेऊन आमदार बंब यांना नेमके काय साध्य करायचे होते? आम्ही निष्क्रिय आहोत, हेच त्यांना दाखवायचे असेल, तर त्यांनी आपल्या मतदारसंघात किती कामे मार्गी लागली हे अगोदर पाहावे, अशी संतप्त प्रतिक्रिया अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी व्यक्त केली. 

ठळक मुद्देआमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेत बैठक घेऊन खर्चाचा आढावा घेतला. जिप अध्यक्षा डोणगावकर म्हणाल्या, शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेत येऊन परस्पर आढावा बैठक घेतली असावी. आमदार बंब म्हणाले, लोकसभा निवडणूक लढण्याचे माझ्या ध्यानीमनी नाही. एक मात्र खरे आहे की, शिवसेनेला आपल्या अस्तित्वाची भीती आहे.

औरंगाबाद : आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेत बैठक घेऊन खर्चाचा आढावा घेतला. नवीन सदस्य मंडळ अस्तित्वात आल्यानंतर जिल्हा परिषदेत आजपर्यंत एक रुपयाचे देखील नियोजन झालेले नाही, यामुळे बंब यांनी अधिका-यांची चांगलीच कानउघाडणी केली. नेमकी हीच बाब अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांना खटकली. आमदारांना अशा प्रकारच्या आढावा बैठका घेता येतात का? पदाधिका-यांच्या अपरोक्ष बैठक घेऊन आमदार बंब यांना नेमके काय साध्य करायचे होते? आम्ही निष्क्रिय आहोत, हेच त्यांना दाखवायचे असेल, तर त्यांनी आपल्या मतदारसंघात किती कामे मार्गी लागली हे अगोदर पाहावे, अशी संतप्त प्रतिक्रिया अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी व्यक्त केली. 

अध्यक्षा डोणगावकर म्हणाल्या की, जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेसची सत्ता आहे. आम्ही सत्ता स्थापनेसाठी भाजपला सोबत घेतले नाही. त्यामुळे शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेत येऊन परस्पर आढावा बैठक घेतली असावी. बैठक घ्यायचीच होती, तर आम्हाला निमंत्रित करायला हवे होते. परंतु, अशा प्रकारची आढावा बैठक आमदारांना घेता येत नाही. उद्या ऊठसूठ प्रत्येक आमदार येऊन बैठका घेत राहतील. आम्ही जिल्हा परिषदेचा कारभार हाकण्यासाठी समर्थ आहोत ना. ‘जीएसटी’ व नवीन ‘डीएसआर’मुळे कामे खोळंबली आहेत. त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हालाही वेळेत निधी खर्च व्हावा, असे वाटत नसेल का, असेही त्या म्हणाल्या.

या बैठकीसंबंधी अध्यक्षांनी प्रशासनालाही जाब विचारला आहे. कोणत्या अधिकाराखाली आमदार बंब यांची बैठक आयोजित करण्यात आली होती? मुख्य कार्यकारी अधिका-यांसह जिल्हा परिषदेतील झाडूनपुसून संपूर्ण विभागप्रमुख या बैठकीला उपस्थित कसे राहिले? तेव्हा सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांनी उत्तर दिले की, कोणत्याही आमदारांना थेट आढावा बैठक घेता येत नाही. चार-पाच दिवसांपूर्वी आमदार बंब यांचे यासंबंधीचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले होते. तेव्हा त्यांना निरोप देण्यात आला होता की, जिल्हा परिषदेत आढावा बैठक घ्यायची असेल, तर अगोदर जिल्हाधिका-यांची परवानगी घ्यावी लागेल. आढावा बैठक न घेता आपण चर्चेला येऊ शकता. यापूर्वीही अनेक आमदारांनी जिल्हा परिषदेत येऊन सीईओंसोबत चर्चा करुन गेले आहेत. एकीकडे, आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे अधिकारी निष्क्रिय आहेत. येत्या तीन महिन्यांत कामांचे नियोजन करून ती मार्गी लावा, नाही तर संबंधित अधिकारी त्यास जबाबदार राहील. मला रिझल्ट हवाय. तीन महिन्यांनंतर पुन्हा मी बैठक घेणार आहे, याकडे आमदार प्रशांत बंब यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. दुसरीकडे, बंब यांच्या बैठकीस उपस्थित राहिल्याबद्दल अध्यक्षांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. सध्या आमदार आणि अध्यक्षांच्या भांडणात जिल्हा परिषदेतील अधिका-यांचे मात्र सँडवीच झाले आहे.

खैरेंसमोर सारेच उमेदवार फिके - अध्यक्षा डोणगावकरआमदार बंब हे विधिमंडळाच्या ईजीएस कमिटीचे चेअरमन आहेत. त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. या नात्याने त्यांनी बैठक घेतली असेल, याकडे अध्यक्षांचे लक्ष वेधले. तेव्हा डोणगावकर म्हणाल्या की, जिल्ह्यातील अनेक शेतक-यांनी रोजगार हमी योजनेतून विहिरी खोदल्या आहेत. स्वत:चे पैसे विहिरींसाठी गुंतवले आहेत; परंतु मागील दोन-तीन वर्षांपासून त्यांना निधी मिळालेला नाही. याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. बंब यांनी मतदारसंघात दिलेल्या आश्वासनांपैकी आतापर्यंत किती कामे केली, याची चाचपणी ते करीत नाहीत. आमदार बंब हे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार आहेत का, याकडेही अध्यक्षांचे लक्ष वेधले. तेव्हा त्या म्हणाल्या, आजपर्यंतचा इतिहास सांगतो की, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर जिल्ह्यातील कोणत्याही पक्षाचा उमेदवार टिकलेला नाही. बंब यांच्यासारखे कितीही आले, तरी खैरेंचा विजय निश्चितच आहे.

शिवसेनेला अस्तित्वाची भीती - आमदार बंब आमदार बंब म्हणाले, लोकसभा निवडणूक लढण्याचे माझ्या ध्यानीमनी नाही. एक मात्र खरे आहे की, शिवसेनेला आपल्या अस्तित्वाची भीती आहे. त्यांनी विकासकामांची स्पर्धा करावी. त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. त्यांनीही माझ्या मतदारसंघात जाऊन बैठका घ्याव्यात. मी लोकांना केलेल्या कामांचा हिशेब देईन. तुम्हीही हिशेब द्या. बैठका घेण्याचा मला छंद नाही. उलट त्यांनी जे काम करायला हवे होते, ते केले नाही. त्यामुळे मला बैठक घ्यावी लागली.

जिल्हा परिषदेत माझ्या पक्षाचे २३ सदस्य आहेत. आजपर्यंत एकाही पैशाच्या कामाचे नियोजन झालेले नाही. माझ्या सदस्यांना उघड्यावर टाकून चालणार नाही. राहिला प्रश्न ईजीएसअंतर्गत विहिरींचा. मी आत्ता या समितीचा अध्यक्ष झालो आहे. पंचायत समितीमध्ये सेनेची सत्ता होती. दोन वर्षांपूर्वी त्यांच्याच लोकांनी पैसे घेऊन विहिरी दिल्या. काही तरी चुकले असेल, तेव्हाच पैसे मिळाले नसतील ना, असे बंब म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणPrashant Bambप्रशांत बंबChandrakant Khaireचंद्रकांत खैरे