शहरं
Join us  
Trending Stories
1
NASHIK FIRE BREAKING VIDEO: नाशिकमध्ये अग्निकल्लोळ! प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग; १८ बंब पोहोचले, तरीही...
2
निलंबित PSI रणजीत कासले पुण्यात दाखल; निवडणुकीत गप्प राहण्यासाठी कराडने पैसे दिल्याचा आरोप
3
IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला!
4
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले
5
तात्पुरता दिलासा की क्लीन चिट? ससूनच्या चार पानी अहवालात दीनानाथ रुग्णालय, डॉ. घैसास यांच्यावर ठपका नाही
6
MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...
7
दूतावासामधून तक्रार, सरकारने जेएनयूच्या ज्येष्ठ प्राध्यापकांना तातडीने केलं बरखास्त, केलं होतं धक्कादायक कृत्य
8
“हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला”: विजय वडेट्टीवार
9
पांड्याचं सेलिब्रेशन झालं! हेडनं मान खाली घालून पॅव्हेलियनचा रस्ता धरलेला अन् 'सायरन' वाजला
10
वेलांटी, मात्रा चुकल्याने बोगसपणा उघड; शिक्षण घोटाळ्यात बोगस कागदपत्रे बनविणारा अखेर सापडला
11
भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष वयाच्या ६१ व्या वर्षी बांधणार लग्नगाठ, पक्षाच्या महिला कार्यकर्तीसोबत अडकणार विवाह बंधनात
12
अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
13
…तर ते कागद दाखवावे लागतील?, नव्या ‘वक्फ’ कायद्यावरील सुनावणीत ती मेख, केंद्र होणार खूश   
14
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
15
आयटेलचा 'एआय'वाला ए९५ स्मार्टफोन लाँच; १०,००० च्या आत किंमत...
16
IPL 2025 MI vs SRH : काय करायचं त्या बॉलरनं? दीपक चाहरनं जोर लावला! पण...
17
VIDEO: परप्रांतीय विक्रेत्याने गटारात धुतले ताडगोळे; खेडमधील किळसवाणा प्रकार
18
बॉम्ब हल्ला प्रकरणात लष्कराच्या जवानाला अटक; गँगस्टरला इंस्टाग्रामवरुन दिले ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण
19
आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा
20
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली

रुग्णाला काय अमृत पाजले का? ६ लाखांच्या बिलावरून आमदार बांगरांनी डॉक्टरला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:49 IST

गरिबांची आर्थिक पिळवणूक थांबवण्याचे आवाहन करत रुग्णालयाने उर्वरित बिल माफ करण्याची मागणी आमदार बांगर यांनी केली आहे. 

छत्रपती संभाजीनगर: डेंग्यूने त्रस्त असलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या दहा दिवसांच्या उपचारासाठी तब्बल सहा लाख रुपयांचे बिल शहरातील एका खाजगी धर्मादाय रुग्णालयाने दिले, आधीच मोठा खर्च झाल्याने रुग्णाचे नातेवाईक नवीन बिलाने हतबल झाले. या प्रकाराची माहिती मिळताच  शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी तातडीने हस्तक्षेप करून शहरातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरला चांगलेच सुनावले. गरिबांची आर्थिक पिळवणूक थांबवण्याचे आवाहन करत रुग्णालयाने उर्वरित बिल माफ करण्याची मागणी आमदार बांगर यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आमदार बांगर आणि डॉक्टर यांच्यातील संवाद व्हायरल झाला आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीचे वृत्त ताजं असतानाच, ही दुसरी घटना आरोग्यव्यवस्थेतील पारदर्शकतेवर आणि नियमनावर प्रश्न उपस्थित करते. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील आदिती माणिकराव सरकटे या मुलीला डेंग्यू झाला होता. तिच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता, तिला छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाने तब्बल तीन लाख रुपयांचे औषधं मागवली. प्रकृती सुधारल्यानंतर रुग्णालयाने आणखी २ लाख ८५ हजार रुपयांचे बिल दिले. त्यातील १ लाख ८० हजार रुपये आधीच भरले गेले होते. मात्र त्यानंतर पुन्हा ८५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली, जी रुग्णाच्या कुटुंबीयांसाठी कठीण होती. त्यामुळे शेवटी रुग्णाच्या कुटुंबीयांनी आमदार संतोष बांगर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी लगेच रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवर संवाद साधत परिस्थितीची चौकशी केली.  

तुम्ही काय अमृत पाजलं रुग्णाला?यावेळी आमदार बांगर यांनी "दहा दिवसांत सहा लाख रुपयांचं बिल कसं काय? तुम्ही काय अमृत पाजलं रुग्णाला?" अशा शब्दात फटकारले. डॉक्टरांनी रुग्ण गंभीर होता आणि व्हेंटिलेटरवर होता असं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदार बांगर यांनी थेट सांगितलं की, "रुग्ण चांगला झाला हे स्वागतार्ह आहे, पण याचा अर्थ गरिबांना लुटायचा नव्हे. आम्ही पदरमोड करून रुग्ण वाचवतो, तेव्हा अशी बिले अन्यायकारक आहेत. गरिबांची पिळवणूक थांबवा." त्यांनी स्पष्ट शब्दांत रुग्णालयाला चेतावणी दिली की, गरज पडल्यास कारवाई केली जाईल.

उर्वरित बिल माफ करण्याची मागणीदरम्यान, संतोष बांगर यांच्या स्पष्ट आणि ठाम भूमिकेमुळे अखेर रुग्णालय प्रशासनाने उर्वरित रक्कम माफ करण्याचे आश्वासन दिले. मात्र, या प्रकरणामुळे राज्यभरात पुन्हा एकदा खाजगी रुग्णालयांतील आर्थिक शोषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर सामान्य जनतेत तीव्र संताप निर्माण झाला आहे. सामान्य माणसासाठी खाजगी रुग्णालयात उपचार घेणे अवघड होत चालले आहे. या प्रकारांवर शासनाने तातडीने लक्ष घालून कठोर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :santosh bangarसंतोष बांगरHingoliहिंगोलीhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर