शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थेतील पुंजीचे काय? २०० कोटींच्या ‘आदर्श’ घोटाळ्याने खातेदारांचा जीव टांगणीला!

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 13, 2023 18:24 IST

नियमबाह्य कर्जाची खैरात वाटप करणाऱ्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने तब्बल २०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचे पितळ उघडे पडले.

छत्रपती संभाजीनगर : तब्बल १३ टक्के दराने व्याजदर देतो, असे सांगितल्याने आम्ही आमची आयुष्याची पुंजी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवली. पण, हीच बँक आमच्या पैशाचे संरक्षण करण्यापेक्षा ‘भक्षक’ बनेल, हे आमच्या मनातही कधी आले नाही. माझ्या निवृत्तीची सर्व रक्कम या बँकेत ठेवली, आता उर्वरित आयुष्य ‘भीक’ मागून जगण्याची वेळ माझ्यावर आली आहे, असा संताप ज्येष्ठ नागरिक व्यक्त करीत होते.

नियमबाह्य कर्जाची खैरात वाटप करणाऱ्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने तब्बल २०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचे पितळ उघडे पडले. अध्यक्ष अंबादास मानकापे व इतर संचालकांविरोधात मंगळवारी सिडको ठाण्यात गुन्हे दाखल झाले. बुधवारी वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध होताच खातेदारांनी बँकेसमोर गर्दी केली होती. आमचे पैसे आम्हाला परत द्या, अशी मागणी व्यक्त करत होते. दुपारी पोलिस निरीक्षक संभाजी पवार आले व पतसंस्थेत व्यवस्थापकांकडे त्यानी चौकशी केली. त्यानंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांना खातेदारांनी गराडा घातला होता. आता आमची रक्कम मिळेल का, असा प्रश्न त्यांनी पवार यांना केला. तुम्ही तुमच्या तक्रारी पोलिस स्टेशनला दाखल करा, आम्ही फरार संचालकांचा शोध घेत आहोत. त्यांची संपत्ती जप्त करून तुमची रक्कम परत केली जाईल, असा धीर त्यांनी खातेदारांना दिला. पोलिस निघून गेल्यानंतरही सायंकाळपर्यंत खातेदार पतसंस्थेबाहेर उभेच होते. मात्र, पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालकांपैकी तिकडे कोणी फिरकले नाही.

आमची फसवणूकजास्तीचे व्याज देत असल्याने आम्ही पतसंस्थेत खाते उघडले. आयुष्याची रक्कम भरली. संचालक मंडळाने आमचा विश्वासघात केला. काही करा, आमची रक्कम परत करा. आता उतारवयात काय करणार?- श्रीनिवास तोतला, ज्येष्ठ नागरिक

१६ लाख अडकलेदुप्पट व्याजदर देत असल्याने माझे, माझ्या आईचे व इतर नातेवाइकांचे १६ लाख रुपये पतसंस्थेत ठेवले होते.- अफरीन मजीद सय्यद,खातेदार

ठेवीदार लागले पाठीमागेमी या पतसंस्थेत कलेक्शन एजंट म्हणून काम करीत होतो. मी स्वत: ३ लाख रुपये खात्यात ठेवले. तर, सव्वा लाख रुपये अन्य ठेवीदारांचे ठेवले होते. आता हे ठेवीदार माझ्या पाठीमागे लागले आहेत.- कृष्णा गोडसे, कलेक्शन एजंट

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी