शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

ही कसली स्मार्ट सिटी! छत्रपती संभाजीनगरात ४० वाहतूक सिग्नलपैकी २९ सिग्नल ३० वर्षे जुनेच

By सुमित डोळे | Updated: June 26, 2024 15:12 IST

मनपाला बेशिस्त वाहतुकीचे सोयरसुतक नाही, जी-२० मध्ये ५० कोटींचा खर्च, अधिकाऱ्यांच्या दालनांवर लाखोंची उधळण, वाहतूक व्यवस्थेचे मात्र तीनतेरा,

छत्रपती संभाजीनगर : आठ वर्षांपूर्वी शहराचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला. त्यानंतर शहरात अनेक विकासकामे सुरू झाल्याचा दावा मनपाने केला. जी-२० दरम्यान शहराच्या सुशोभीकरणावर कोट्यवधींचा खर्च झाला. मात्र, शहराची वाहतूक व्यवस्थेवर खर्चासाठी मनपाच्या स्मार्ट सिटी विभागाला सपशेल विसर पडला. स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात वाहतुकीची धुरा असलेली सिग्नल तब्बल ३० वर्ष जुनाट व निष्क्रिय झालेली आहे. परिणामी, संपूर्ण शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले असताना मनपाला मात्र त्याचे सोयरसुतक नाही, हे विशेष.

जून २०१५ मध्ये लाँच झालेल्या स्मार्ट सिटी मिशनद्वारे नागरिकांना मुख्य पायाभूत सुविधा, स्वच्छ वातावरण, स्मार्ट जीवनाचा दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. प्रतिवर्ष सुमारे १०० कोटींचा निधी यातून शहरांना देण्याचे नियोजित होते. शहरात स्मार्ट सिटी योजनेतून ७०० कोटींपेक्षा अधिक मोठ्या प्रकल्पांचे नियोजन करून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे स्वप्न अधिकाऱ्यांनी दाखवले. मात्र, यात शहराची प्रतिमा अवलंबून असलेल्या वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. पोलिसांच्या मते, वाहनांची संख्या लोकसंख्येच्या ६० टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. एकीकडे शहरात वाहनांची संख्या भरमसाठ वाढत असताना तुलनेत वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी प्रभावी व्यवस्थाच उभी केली गेली नसल्याची खंत पोलिसांनी व्यक्त केली.

यासाठी इच्छाशक्तीच नाहीराज्यातील अन्य स्मार्ट सिटी असलेल्या वाहतूक समिती कार्यरत आहे. त्यात मनपा आयुक्त, अभियंत्यांसह, वाहतूक अभियंत्यांचा समावेश असतो. ठराविक कालावधीनंतर या समितीची बैठक होऊन शहराच्या वाहतूक समस्यांवर चर्चा व उपाययोजना ठरवले जाते. शहरात मात्र मनपाकडे वाहतूक अभियंता असे पदच नाही. शिवाय, गेल्या तीन वर्षांपासून मनपा प्रशासक वा अन्य अधिकाऱ्यांनी वाहतुकीच्या समस्यांसाठी एकही बैठक बोलावली नाही.

अशी आहे सिग्नलची अवस्था :येथे ३० वर्षे जुने सिग्नल-बाबा पेट्रोल पंप, पंचवटी, नगरनाका, हॉटेल अमरप्रीत, मोंढा नाका, आकाशवाणी, जिल्हाधिकारी कार्यालय, सूतगिरणी, गजानन महाराज मंदिर, जुने हायकोर्ट, हॉटेल कार्तिकी, मिल कॉर्नर, रेल्वेस्टेशन चौक, सिल्लेखाना, समर्थनगर, जुब्ली पार्क, बलवंत चौक, क्रांतीचौक, महानुभव आश्रम, नवीन हायकोर्ट चौक, एस.बी.ओ.ए. चौक, सिडको बसस्थानक, मुकुंदवाडी, एन-१ चौक, टी. व्ही. सेंटर चौक, शरद टी पॉईंट, बजरंग चौक, आंबेडकर चौक.

२०१५ मध्ये नवे ९ सिग्नल१९९४-९५ नंतर शहरात २०१५ मध्ये ९ नवे सिग्नल बसवण्यात आले. यात चंपा चौक, रोपळेकर रुग्णालय, शहानूर मिया दर्गा चौक, बी. एस. एन. एल. चौक, जवाहरनगर पोलिस ठाणे चौक, सेव्हनहिल उड्डाणपूल, सिटी क्लब, कोकणवाडी, चिश्तिचा चौकाचा समावेश करण्यात आला.

केवळ २ स्मार्ट सिग्नलशहराची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे खोळंबलेली असताना स्मार्ट सिटीकडून केवळ ओखार्ड चौक व मिलिंद चौकात अद्ययावत प्रणालीचे सिग्नल बसवण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले. अन्यत्र दुरुस्ती देखील नीट केली गेली नाही.

साधे टाईमरही नाही-४० सिग्नलपैकी २१ सिग्नलमध्ये टाइमर बंद आहे.-८ सिग्नलमध्ये टाइमर प्रणालीच नाही.-३८ सिग्नलमध्ये साधा फ्रि लेफ्ट टर्न लॅम्प नाही.

वाहनांची संख्या अचंबित करणारी-२०१९ मध्ये १३ लाख ६८ हजार वाहने. -२०२३-२४ मध्ये ८२ हजार ७२७ वाहनांची भर.-मे, २०२४ पर्यंत १६ लाख ७० हजार वाहनांची नोंद.-महिन्याला सरासरी सात हजार वाहनांची भर.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी