शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

नकली सोन्याचा हार घेऊन बँकेत लाखांचे कर्ज मागायला गेले अन् अडकले

By सुमित डोळे | Updated: April 11, 2024 12:20 IST

उधारी फेडण्याची शक्कल अंगलट; एसबीआय बँकेत दोन तरुण रंगेहाथ पकडले गेले

छत्रपती संभाजीनगर : रविवारच्या बाजारातून दीड हजार रुपयांत खोट्या सोन्याचा हार विकत घेऊन दोन तरुणांनी एसबीआय बँक गाठली. तेथे जाऊन सोने गहाण ठेवून कर्जाची मागणी केली. मात्र, क्षणात त्यांचा भांडाफोड होऊन त्यांची रवानगी थेट पोलिस ठाण्यात झाली. सादिक शामक शेख (वय २८, रा. जळगाव फेरण) व उद्धव गंगाधर साळुंके (३२, रा. गोलटगाव) असे संशयितांची नावे असून, जवाहरनगर पोलिसांनी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

एसबीआय बँकेच्या शिवाजीनगरच्या शाखेमध्ये उद्धव व सादिक दुपारी दोन वाजता गेले होते. कर्जाची गरज असल्याचे सांगून गोल्ड लोनसाठी सोने गहाण ठेवण्याची तयारी त्यांनी दर्शविली. त्यासाठी हुबेहूब सोन्याचा वाटावा असा एक हारदेखील बँक कर्मचाऱ्यांच्या हाती टेकविला. मात्र, कर्मचाऱ्यांना तेथेच संशय आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना संपर्क साधला. निरीक्षक सूरज बंडगर यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक अर्जुन राऊत, अंमलदार मारोती गोरे, विष्णू काळे यांनी बँकेत धाव घेतली. तोपर्यंत सादिक पळण्याच्या तयारीत होता. गोरे यांनी मात्र त्याला पकडून ठेवले. त्याचा मित्र उद्धव सूतगिरणी चौकात दुचाकीसह उभा होता. पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेत त्यालाही ताब्यात घेत दोघांना ठाण्यात नेले.

उधारी फेडण्यासाठी केला प्रयत्नउद्धव व सादिक दोघेही सुशिक्षित असून, दोघांचे बाहेर मोठ्या प्रमाणात व्यवहारातून उधारी झाली आहे. ती फेडण्यासाठी दोघेही झटपट पैशांचा मार्ग शोधत होते. यापूर्वी त्यांनी बदनापूरच्या एका बँकेत असाच प्रयत्न केला. मात्र, तेथून त्यांना हाकलून देण्यात आले. बँकेने यात तक्रार देण्यास नकार दिल्याने अंमलदार मारोती गोरे यांच्या फिर्यादीवरून यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी