शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

'आम्हाला न्याय हवा', सोमनाथच्या आईचा आक्रोश; शवविच्छेदनानंतर पार्थिव परभणीकडे रवाना

By संतोष हिरेमठ | Updated: December 16, 2024 12:15 IST

सकाळी साडेअकरा वाजता शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पार्थिव रुग्णवाहिकेने परभणीकडे रवाना झाले.

छत्रपती संभाजीनगर : परभणी येथे  दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदन होत असताना सोमनाथच्या आईने आणि नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. मुलाच्या मृत्यूप्रकरणी न्याय देण्याची मागणी सोमनाथच्या आईने केली.

सकाळी साडेअकरा वाजता शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पार्थिव रुग्णवाहिकेने परभणीकडे रवाना झाले. यावेळी रुग्णवाहिकेसोबत मोठा पोलीस बंदोबस्त होता. घाटीत शवविच्छेदनगृह परिसरात आंबेडकरी चळवळीतील  नेते, पदाधिकारी यांच्यासह युवकांनी मोठी गर्दी केली. यावेळी सोमनाथ अमर रहे अशा घोषणांसह पोलीस विरोधातील घोषणाही देण्यात देण्यात आल्या. 

शवविच्छेदनापूर्वी तरुणाच्या मृतदेहाचे सीटी स्कॅनपरभणी येथे न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेला तरुण सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी (३६, रा. भोसरी, जि. पुणे, ह.मु. शंकरनगर, परभणी) याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात दाखल झाला. घाटीत मृतदेह दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम सीटी स्कॅन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनगृहात दाखल करण्यात आला. परंतु, शवविच्छेदनापूर्वी रक्ताच्या नातेवाइकांनी मृतदेहाची ओळख पटवून घेणे आवश्यक आहे. सोमनाथचे आई-वडील आणि इतर कोणी अगदी जवळचे नातेवाईक घाटीत आलेले नव्हते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन सुरू झालेले नव्हते. रक्ताचे नातेवाईक उशिरा आल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सोमवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले.

शहरासह परभणीहून कार्यकर्ते दाखल, जोरदार घोषणाशवविच्छेदनासाठी सोमनाथचा मृतदेह घाटीत आणण्यात आल्याची माहिती मिळताच शवविच्छेदनगृह परिसरात शहरातील आंबेडकरी चळवळीतील नेते, पदाधिकारी यांच्यासह युवकांनी मोठी गर्दी केली. यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सूर्यवंशी यास न्याय मिळालाच पाहिजे, यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. अनेकांनी मृत्यूविषयी तीव्र संताप व्यक्त केला. परभणी येथील पदाधिकारी व कार्यकर्ते घाटीत दाखल झाले.

नायब तहसीलदारांसह डाॅक्टरांचे पथकनायब तहसीलदार, पोलिस अधिकारी यांच्यासह ५ डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले. शवविच्छेदनासाठी मृतदेह दाखल होण्यापूर्वी अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी शवविच्छेदनगृहाला भेट देत आढावा घेतला.

मारहाणीमुळे मृत्यूपोलिसांनी मारहाण केल्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाला आहे, असा आमचा आरोप आहे. शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत. तो विधिच्या (लाॅ) शिक्षणासाठी परभणीत आला होता. - प्रा. अनिल कांबळे

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरparabhaniपरभणीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरCrime Newsगुन्हेगारी