शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

आपण शिकलो-सवरलो; पण बुद्धिजीवी नाही बनलो : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 19:45 IST

देशात एवढे मोठे षडयंत्र रचले जात आहे; पण त्यापासून आपण अनभिज्ञ राहत आहोत.

ठळक मुद्देबामसेफच्या तीन दिवसीय अधिवेशनाला उत्साहात प्रारंभ बामसेफच्या मंचावर आंबेडकर कसे? 

औरंगाबाद : आपण शिकलो-सवरलो; पण बुद्धिजीवी नाही बनलो. देशात एवढे मोठे षडयंत्र रचले जात आहे; पण त्यापासून आपण अनभिज्ञ राहत आहोत. आपण वर्तमानात जगत नाही. वर्तमानातूनच भविष्य बनत असते. भविष्यातून वर्तमान घडत नाही, असे मौलिक विचार शुक्रवारी येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले. 

बीड बायपास रोडवरील वासंती मंगल कार्यालयात शुक्रवारपासून सुरू झालेल्या बामसेफच्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. ‘सामाजिक परिवर्तन फुले-आंबेडकरी मिशनसे, या दिशाहीन आंदोलनसे?’ असा या सत्राचा विषय होता. सकाळी पू. भदन्त करुणाकर महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर पहिले सत्र सुरू झाले. 

पूज्य भदन्त खेमधम्मो महाथेरो यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.देशाला व संविधानालाही वाचवावयाचे आहे. कारण संविधान संपुष्टात आणण्याचे मोठे षडयंत्र रचले गेले आहे. याविरुद्धची लढाई प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लढाई लढावी लागेल, असे प्रतिपादन भदन्त खेमधम्मो यांनी केले, तर पू. भदन्त करुणाकर महाथेरो यांनी, प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राबाहेर पडावे. उत्तर प्रदेश त्यांची वाट पाहत आहे, असे साकडे घातले. 

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची एनआरसी व सीएएबद्दलची रोखठोक भूमिका समोर आलेली आहे. आजही ते या मुद्यावर पोटतिडकीने बोलत होते. एनआरसी कायदा किती जणांना माहिती आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. उपस्थितांमधून अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. फक्त दोन-तीन जणांनी हात वर केले. हे पाहून प्रकाश आंबेडकर  अवाक् झाले. मग हे अधिवेशन कशासाठी? इतिहासात रममाण होण्यासाठी, आत्मिक समाधानासाठी, बामसेफच्या कॅडर कॅम्पमधून नेते का तयार होत नाहीत, असे प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केले.

प्रारंभी, नेहा राव, सत्यप्रकाश बौद्ध व डॉ. जितेंद्र बौद्ध यांनी क्रांतिगीते गायिली. के. बी. दिवेकर यांनी प्रास्ताविक केले. बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष अतरवीरसिंह यांचेही यावेळी भाषण झाले.

बामसेफच्या मंचावर आंबेडकर कसे? बामसेफच्या मंचावर प्रकाश आंबेडकर कसे, अशी चर्चा आजही होत होती. यासंदर्भात बामसेफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष के. बी. दिवेकर यांनी सांगितले की, आम्ही यापूर्वीही बामसेफच्या मंचावर आंबेडकरांना आणले होते व ते आले होते. बामसेफचे अन्य गट प्रकाश आंबडेकर व भिक्खू संघालाही मानत नाहीत. आम्ही या दोघांनाही मानतो. त्यामुळे बामसेफच्या मंचावर आंबेडकरांचे येणे यात गैर काहीच नाही. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSocialसामाजिकAurangabadऔरंगाबाद